शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
5
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
6
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
7
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
8
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
9
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
10
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
11
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
12
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
13
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
14
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
15
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
16
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
17
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
18
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
19
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
20
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता

‘पाप्या’च्या खुनाचा बदला घेण्यासाठीच हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:24 IST

पेठरोड परिसरातील सराईत बालगुन्हेगार हृतिक ऊर्फ पाप्या राजू शेरगिल याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्याचा भाऊ हरीश ऊर्फ हºया शेरगिल याने आपल्या सहा साथीदारांसमवेत खुनातील प्रमुख संशयित चेतन संजय पवार (१७, शनिमंदिराशेजारी, पेठरोड, नाशिक) याच्यावर तिबेटीयन मार्केटमध्ये प्राणघातक हल्ला केल्याचे समोर आले आहे़ याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ शनिवारी (दि़१९) सायंकाळी पवार याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती़

नाशिक : पेठरोड परिसरातील सराईत बालगुन्हेगार हृतिक ऊर्फ पाप्या राजू शेरगिल याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्याचा भाऊ हरीश ऊर्फ हºया शेरगिल याने आपल्या सहा साथीदारांसमवेत खुनातील प्रमुख संशयित चेतन संजय पवार (१७, शनिमंदिराशेजारी, पेठरोड, नाशिक) याच्यावर तिबेटीयन मार्केटमध्ये प्राणघातक हल्ला केल्याचे समोर आले आहे़ याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ शनिवारी (दि़१९) सायंकाळी पवार याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती़ ७ फेबु्रवारी २०१७ रोजी पेठरोडवरील मोती सुपर मार्केटजवळ पाप्या शेरगिल याचा खून करण्यात आला़ या खुनातील प्रमुख संशयित चेतन पवार याची शनिवारी (दि़१९) उंटवाडीतील बाल न्याय मंडळात तारीख होती़ त्यासाठी पवार हा आपल्या आई-वडिलांसमवेत तारखेसाठी हजर होता़ यानंतर तिबेटीयन मार्केटमध्ये कपडे खरेदीसाठी गेलेल्या चेतन पवार याच्या मागावर असलेले संशयित विक्की बाळू जाधव ऊर्फ काळ्या तोतरा, पाप्याचा भाऊ हरीश ऊर्फ हºया शेरगिल, रोहन अहिरे, राकेश पवार, गौतम ताठे, ललित ऊर्फ लल्या सुरेश राऊत व अजय भईटा या संशयितांनी चाकू, कोयता व चॉपरने डोके व पाठीवर वार केले़  या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या चेतन पवार यास प्रथम जिल्हा रुग्णालय व त्यानंतर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे़ दरम्यान, याप्रकरणी संजय रामलाल पवार यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात फिर्याद दिली आहे़ दरम्यान, सरकारवाडा पोलिसांनी संशयित हरीश ऊर्फ हºया शेरगिल व ललित ऊर्फ लल्या सुरेश राऊत यांच्यासह आणखी दोघांना ताब्यात घेतले आहे़