दारू पिण्यास विरोध केल्याने एकावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 00:18 IST2020-06-09T00:17:18+5:302020-06-09T00:18:05+5:30

जेलरोड परिसरात सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यास विरोध केल्याने तिघांनी टवाळखोरांनी मिळून एका व्यक्तीला गंभीर मारहाण करून चाकूने हल्ला करत जखमी केल्याचा प्रकार घडला आहे.

Attack on one for resisting drinking | दारू पिण्यास विरोध केल्याने एकावर हल्ला

दारू पिण्यास विरोध केल्याने एकावर हल्ला

नाशिकरोड : जेलरोड परिसरात सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यास विरोध केल्याने तिघांनी टवाळखोरांनी मिळून एका व्यक्तीला गंभीर मारहाण करून चाकूने हल्ला करत जखमी केल्याचा प्रकार घडला आहे.
जेलरोड, कॅनलरोड भागांतील आम्रपालीनगर येथील रिक्षाचालक बाबासाहेब गुडेकर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास गुडेकर यांच्या घराच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत दत्ता हिरोडे व त्याचे दोन साथीदार दारू पित बसले होते. गुडेकर यांनी तिघांना सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यास आक्षेप घेतला. त्यामुळे संतप्त झालेल्या दत्ता हिरोडे व त्याच्या दोन मित्रांनी गुडेकर यास शिवीगाळ करून चप्पल व लाकडी दांड्याने मारहाण केली. त्यानंतर चाकूने गुडेकर यांच्या हातावर व कमेरवर वार करून जखमी केले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Attack on one for resisting drinking