लग्नाच्या आमिषाने तरुणीवर अत्याचार; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 01:21 IST2021-09-16T01:20:24+5:302021-09-16T01:21:17+5:30

येवला तालुक्यातील २२ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करून गर्भपात केल्याची फिर्याद शहर पोलिसात दाखल झाली आहे.

Atrocities on young women in the lure of marriage; Filed a crime | लग्नाच्या आमिषाने तरुणीवर अत्याचार; गुन्हा दाखल

लग्नाच्या आमिषाने तरुणीवर अत्याचार; गुन्हा दाखल

येवला : तालुक्यातील २२ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करून गर्भपात केल्याची फिर्याद शहर पोलिसात दाखल झाली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की, तालुक्यातील उंदीरवाडी येथील २२ वर्षीय तरुणीशी फोनवरून ओळख वाढवून नवनाथ खोडके रा. येवला याने मैत्रीचे संबंध निर्माण केले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तरुणीस ८ ऑगस्ट रोजी चारचाकी वाहनातून येवला-नाशिक महामार्गावरील हॉटेलमध्ये नेऊन बळजबरी केली. यानंतर गर्भवती राहिलेल्या तरुणीस खोडके याने डॉ. सुरेश (रा. हिसवळ ता. नांदगाव) यांच्याकडे नेऊन सोनोग्राफी केली व गर्भपात केला.

सदर पीडितेच्या फिर्यादीवरून नवनाथ खोडके व डॉ. सुरेश यांच्याविरुद्ध बलात्कार व गर्भपाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे हे करीत आहेत.

Web Title: Atrocities on young women in the lure of marriage; Filed a crime