वासाळी येथे विवाहितेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 00:43 IST2021-06-15T22:34:43+5:302021-06-16T00:43:33+5:30

घोटी : इगतपुरी तालुक्यातील वासाळी येथे पतीशी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एका युवकाने एका मजूर महिलेवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. वासाळी येथे मजुरीवर आलेल्या महिलेवर गावातीलच एका युवकाने अत्याचार केल्याची फिर्याद पीडित महिलेने घोटी पोलीस ठाण्यात दिली. यावरून पोलिसांनी संशयितास अटक केली आहे.

Atrocities on married women at Vasali | वासाळी येथे विवाहितेवर अत्याचार

वासाळी येथे विवाहितेवर अत्याचार

ठळक मुद्देघोटी : संशयितास पोलिसांनी केली अटक

घोटी : इगतपुरी तालुक्यातील वासाळी येथे पतीशी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एका युवकाने एका मजूर महिलेवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. वासाळी येथे मजुरीवर आलेल्या महिलेवर गावातीलच एका युवकाने अत्याचार केल्याची फिर्याद पीडित महिलेने घोटी पोलीस ठाण्यात दिली. यावरून पोलिसांनी संशयितास अटक केली आहे.

वासाळी येथे विहिराला बोर मारण्याचे काम करणारे दांपत्य मजुरीवर आले असून यातील महिलेच्या पतीचे गावातच राहणाऱ्या रंगनाथ रामनाथ काठे (३०) याच्याबरोबर रविवारी (दि.१३) सायंकाळी भांडण झाले. त्याच रात्री साडेआठ वाजता या महिलेच्या घरी जाऊन महिलेच्या पतीला पुन्हा मारहाण केली. या भांडणात ही महिला पतीला सोडविण्यास गेली असता रंगनाथ काठे याने तिला दम दिला. यानंतर काही वेळाने संशयिताने तिला डोंगराकडे ओढत नेऊन तिच्यावर अत्याचार केला. महिलेने आरडाओरडा करताच संशयित घटनास्थळावरून फरार झाला. याबाबत पीडित महिलेने घोटी पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगून फिर्याद दिली.
याबाबत घोटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, सहायक उपनिरीक्षक अनिल धुमसे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन संशयितास अटक केली. त्याच्या विरोधात भादंवि कलम ३७६/(१), ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक श्रध्दा गंधास हे करीत आहे.

Web Title: Atrocities on married women at Vasali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.