जातीय सलोख्याचे वातावरण कौतुकास्पद : सागर महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 00:10 IST2018-03-29T00:10:45+5:302018-03-29T00:10:45+5:30
परिसरातील सर्वजातीय सलोखा कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादनश्री १०८ उपाध्याय तेजस्वी सागर महाराज यांनी केले. अंदरसूल येथे श्री १००८ धर्मनाथ दिगंबर जैन मंदिर नवनिर्माण व कलशारोहण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी श्री १०८ उपाध्याय तेजस्वी सागर महाराज यांनी प्रवचनात म्हणाले, सध्याचा काळात मानव जाती जातीत लढताना दिसतात, परंतु येथे जातीय सलोखा दिसून आला.

जातीय सलोख्याचे वातावरण कौतुकास्पद : सागर महाराज
अंदरसूल : परिसरातील सर्वजातीय सलोखा कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादनश्री १०८ उपाध्याय तेजस्वी सागर महाराज यांनी केले.
अंदरसूल येथे श्री १००८ धर्मनाथ दिगंबर जैन मंदिर नवनिर्माण व कलशारोहण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी श्री १०८ उपाध्याय तेजस्वी सागर महाराज यांनी प्रवचनात म्हणाले, सध्याचा काळात मानव जाती जातीत लढताना दिसतात, परंतु येथे जातीय सलोखा दिसून आला. या जातीय सलोख्याचे वातावरण कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले. यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, माजी आमदार कल्याणराव पाटील, अंबादास बनकर, बाबासाहेब देशमुख, हरिभाऊ जगताप, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, किसनराव धनगे, मकरंद सोनवणे, झुंजारराव देशमुख, सरपंच विनीता सोनवणे आदी उपस्थित होते. महाप्रसादाचा लाभ सर्वांनी घेतला. नगरशेठ हिरालाल जैन, माजी सरपंच पदमा जैन यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रवीण लोहाडे यांनी केले.