सरकारवाडा पोलीसांच्या सतर्कतेमुळे एटीएम लूटीचा प्रयत्न फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 02:10 PM2019-11-18T14:10:13+5:302019-11-18T14:12:36+5:30

मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास रविवार कारंजा येथील एटीएम केंद्रात सनीने बॅँकेचा ग्राहक बनून प्रवेश केला. यावेळी त्याने स्वत:जवळील लोखंडी हत्याराने एटीएम यंत्रावर घाव घालण्यास सुरूवात केली.

ATM robbery attempt foiled by Sarkarwada police alert | सरकारवाडा पोलीसांच्या सतर्कतेमुळे एटीएम लूटीचा प्रयत्न फसला

सरकारवाडा पोलीसांच्या सतर्कतेमुळे एटीएम लूटीचा प्रयत्न फसला

Next
ठळक मुद्देमध्यरात्री एटीएम यंत्र फोडण्याचा प्रयत्न केला मध्यरात्री एटीएममध्ये एका युवकाच्या संशयास्पद हालचाली एटीएम केंद्राजवळ जात शटर खाली ओढले

नाशिक : नोकरीच्या शोधात उत्तरप्रदेश राज्यातून शहरात भटकंती करत गोदाकाठावर वास्तव्य करणाऱ्या एका तरूण परप्रांतीय चोरट्याने रविवारकारंजा येथील पंजाब नॅशनल बॅँकेच्या एटीएम केंद्रात जाऊन सोमवारी (दि.१८) मध्यरात्री एटीएम यंत्र फोडण्याचा प्रयत्न केला; मात्र गस्तीवर असलेल्या बीट मार्शल पोलिसांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तत्काळ संशयित सनी रावत (१९) यास बेड्या ठोकल्या.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास रविवार कारंजा येथील एटीएम केंद्रात सनीने बॅँकेचा ग्राहक बनून प्रवेश केला. यावेळी त्याने स्वत:जवळील लोखंडी हत्याराने एटीएम यंत्रावर घाव घालण्यास सुरूवात केली. यामुळे यंत्राचा पत्रा कापला केलो; परंतू आतमध्ये असलेल्या रोकडच्या ट्रेपर्यंत त्याला पोहचता आले नाही.

दरम्यान, सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या रात्रपाळीच्या गस्तीवर असलेले बीट मार्शल भगवान गवळी व त्यांच्यासोबत असलेल्या गृहरक्षक दलाच्या जवानाच्या मध्यरात्री एटीएममध्ये एका युवकाच्या संशयास्पद हालचाली लक्षात आल्या. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ दुचाकी थांबवून एटीएम केंद्राजवळ जात शटर खाली ओढले. यामुळे संशयित सनी गाळ्यात अडकला. पोलिसांनी तत्काळ बिनतारी संदेश यंत्रणेवरून पोलीस ठाण्याला माहिती देत अतिरिक्त पोलिसांची मदत बोलावून घेतली. पोलिसांचा फौजफाटा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी केंद्राच्या परिसरात क डे केले आणि वाहने उभी करून रस्ता रोखला. यावेळी शटर पुन्हा वर करत सनीला तत्काळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पोलिसांच्या सतर्कतेमुळे शहरात पुन्हा एटीएम यंत्राची लूटीचा प्रयत्न फसला; मात्र एटीएम सुरक्षेचा प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी पुढील तपास उपनिरिक्षक धर्मेश पवार करीत आहेत.

Web Title: ATM robbery attempt foiled by Sarkarwada police alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.