एटीएम फोडून २५ हजार लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 16:04 IST2020-02-04T16:03:32+5:302020-02-04T16:04:00+5:30

पिंपळगाव बसवंत : येथील युको बॅँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी २५ हजार ४०० रूपये लंपास केले.

 ATM breaks 3,000 lumps | एटीएम फोडून २५ हजार लंपास

एटीएम फोडून २५ हजार लंपास

पिंपळगाव बसवंत : येथील युको बॅँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी २५ हजार ४०० रूपये लंपास केले. पिंपळगाव बसवंत येथील चिंचखेड चौफूलीवर युको बॅँकेचे एटीएम आहे. पहाटे चार वाजता बॅकेचे एटीएम फोडन्यासाठी तिघे जण आले असता प्रथम काळ्या रंगाचा स्प्रे चोरट्यांनी सीसीटीव्हीच्या कॅमेरेवर मारला. गॅस कटरच्या सहाय्याने मशिन फोडत त्यातील २५ हजार ४०० रूपये घेऊन पोबारा केला. अवघ्या १२ मिनिटात मशिन फोडत चोरटे पसार झाले. याच चौफूलीवर काही फुटांवर अन्य तीन बॅकचे पण एटीएम असुन पिंपळगाव बसवंत पोलिसांनी सहा महिने पुर्वीच वॉचमन ठेवन्यात यावा यासाठी नोटीस पण दिली. तसेच येथील सर्व बॅक मॅनेजरला पण सुचना दिल्या होत्या. पिंपळगाव येथून शिरवाडे वणी-पालखेड मार्गे चोरटे विंचुरकडे गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Web Title:  ATM breaks 3,000 lumps

टॅग्स :Nashikनाशिक