आत्मविश्वासाने प्रयत्न केल्यास यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:11 IST2017-07-30T23:36:51+5:302017-07-31T00:11:01+5:30

प्रत्येकजण हा स्वत: एक रोल मॉडल आहे. मात्र हे सिद्ध करण्यासाठी आपल्यातील असलेल्या क्षमतेचा पूर्ण वापर करून आत्मविश्वासाने परिश्रम घेतले, तर यशाला गवसणी घालण्यापासून तुम्हास रोख शकणार नाही, असे प्रतिपादन मुंबई येथील दिव्यांग डॉ. रोशनजहॉ शेख यांनी केले.

atamavaisavaasaanae-parayatana-kaelayaasa-yasa | आत्मविश्वासाने प्रयत्न केल्यास यश

आत्मविश्वासाने प्रयत्न केल्यास यश

आझादनगर : प्रत्येकजण हा स्वत: एक रोल मॉडल आहे. मात्र हे सिद्ध करण्यासाठी आपल्यातील असलेल्या क्षमतेचा पूर्ण वापर करून आत्मविश्वासाने परिश्रम घेतले, तर यशाला गवसणी घालण्यापासून तुम्हास रोख शकणार नाही, असे प्रतिपादन मुंबई येथील दिव्यांग डॉ. रोशनजहॉ शेख यांनी केले. मालेगाव पोलिसांच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या संकल्पनेतून शहर व पंचक्रोशीतील सुशिक्षित तरुणांसाठी ‘उडाण’ प्रकल्पाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या वैद्यकीय क्षेत्राबाबत मार्गदर्शन शिबिराप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर पोलीस उपअधीक्षक गजानन राजमाने, अजीत हगवणे, डॉ. शशिकांत वाव्हळ, डॉ. सईद फारान, एम्समध्ये प्रवेश मिळविलेला अनिकेत भामरे हे उपस्थित होते. डॉ. रोशनजहॉ शेख म्हणाल्या की, मालेगाव शहर तुमची आमची मातृभूमी आहेत. येथे अनेक दानशूर व्यक्ती आहेत. आपण आपली क्षमता सिद्ध करा, मदतीचे हात आपोआप पुढे येतील. ७ आॅक्टोबर २००८ मध्ये रेल्वेच्या लोकल प्रवासात अपघात होऊन दोन्ही पाय गमवावे लागले. वडील हातगाडीवर व्यवसाय करीत असल्याने परिस्थिती बेताचीच होती. मला मी ओझे भासे वाटू लागले असताना उपचार करणाºया डॉक्टरांनी मला धीर दिला. त्यातून प्रेरणा घेत मी डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. पोलीस अधिकारी व आमदार आसिफ शेख यांनीही मदत केली. डॉ. शशिकांत वाव्हळ यांनी मार्गदर्शन केले. एम्समध्ये प्रवेश मिळविलेल्या अनिकेत भामरे यांनी आपले अनुभव कथन केले. डॉ. सईद फारानी, अय्युब रहेमानी, सेवानिवृत्त प्राचार्य गुफरान अन्सारी यांचीही भाषणे झाली.



 

Web Title: atamavaisavaasaanae-parayatana-kaelayaasa-yasa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.