आमोदे गावातील पोल्ट्री फार्म स्थलांतराचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 19:02 IST2021-02-24T19:01:07+5:302021-02-24T19:02:41+5:30
नांदगाव : तालुक्यातील आमोदे गावच्या आदिवासी वस्तीजवळ असलेला पोल्ट्री फार्म कायमस्वरूपी बंद करण्यात यावा, यासाठी आदिवासी बांधव आमरण उपोषणास बसले होते. आमदार सुहास कांदे यांनी या उपोषणाची दखल घेऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली व उपोषणकर्ते, तसेच पोल्ट्री फार्म मालक यांच्यात चर्चा घडवून आणत, आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

आमोदे येथील उपोषणकर्त्यांना पोल्ट्री फार्म स्थलांतराचे आश्वासन देताना आमदार सुहास कांदे, तहसीलदार उदय कुलकर्णी, पोलीस निरीक्षक अनिल कातकडे, समवेत आण्णा पगार, रमेश बोरसे आदी.
नांदगाव : तालुक्यातील आमोदे गावच्या आदिवासी वस्तीजवळ असलेला पोल्ट्री फार्म कायमस्वरूपी बंद करण्यात यावा, यासाठी आदिवासी बांधव आमरण उपोषणास बसले होते. आमदार सुहास कांदे यांनी या उपोषणाची दखल घेऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली व उपोषणकर्ते, तसेच पोल्ट्री फार्म मालक यांच्यात चर्चा घडवून आणत, आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
यावेळी जि.प.सदस्य रमेश बोरसे, पंचायत समिती सदस्य सुभाष कुटे, तहसीलदार उदय कुलकर्णी, गटविकास अधिकारी गणेश चौधरी, पोलीस निरीक्षक अनिल कातकडे, आमोदेचे सरपंच विठ्ठल पगार, आण्णासाहेब पगार, रमेशआप्पा पगार, किरण देवरे, प्रमोद भाबड, भैय्या पगार, सागर हिरे आदी उपस्थित होते. पोल्ट्री फार्म गावात असल्याने दुर्गंधी येते, जेवण जात नाही, अशा आदिवासींच्या तक्रारी होत्या.