युवकावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 00:19 IST2020-05-28T00:18:05+5:302020-05-28T00:19:08+5:30

सिन्नर फाटा येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून तीक्ष्ण हत्याराने वार करून एकास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Assault on a youth | युवकावर प्राणघातक हल्ला

युवकावर प्राणघातक हल्ला

नाशिकरोड : सिन्नर फाटा येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून तीक्ष्ण हत्याराने वार करून एकास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिन्नर फाटा गोदरेजवाडी येथील रहिवासी अशपाक सलीम शेख याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास त्याचा चुलतभाऊ इकबाल व त्याचा मित्र अक्षय धुमाळे हे मोटारसायकलवरून जेलरोडला घरी जाण्यास निघाले होते. सिन्नर फाटा येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून सागर कांबळे, वतन वाघमारे, पवन (पूर्ण नाव माहीत नाही), नीलेश दिवे, नान्या यांनी दुचाकी अडवून इकबालवर टोकदार हत्याराने वार करू लागले. त्यामुळे त्याचा मित्र अक्षय अशपाकच्या घरी पळत गेला. अशपाक व अक्षय हे इकबालला वाचविण्यासाठी आले असता सागर कांबळे त्यांच्यामागे हत्यार घेऊन पळू लागला.


त्या ठिकाणी कांबळेने शिवीगाळ करत हातात शस्र घेऊन ‘मी आताच जेलमधून आलो आहे...’ असे म्हणत दहशत पसरवली. इक्बालच्या मानेवर, डोक्याच्या मागील बाजूस, पाठीवर, कंबरेवर, उजव्या पायाच्या बोटावर वार करून गंभीर दुखापात करण्यात आली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Assault on a youth