सुरक्षारक्षकास दोघांची बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 22:42 IST2019-06-13T22:42:05+5:302019-06-13T22:42:22+5:30

वाळूज एमआयडीसीत सुरक्षारक्षकास मारहाण करणाऱ्या दोघांविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

The assassin's assassination | सुरक्षारक्षकास दोघांची बेदम मारहाण

सुरक्षारक्षकास दोघांची बेदम मारहाण

वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीत सुरक्षारक्षकास मारहाण करणाऱ्या दोघांविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


बाबासाहेब गुलाबराव लिपणे (३४ रा. गारखेडा परिसर) हा वाळूज एमआयडीसीती इंडुरन्स (प्लॉट क्रमांक ई-९२) या कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. लिपणे कंपनीत कर्तव्य बजावत असताना बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दुचाकीवरुन आलेल्या दोन अनोळखी तरुणांनी कंपनीच्या गेटसमोर दुचाकी उभी केली. यावेळी सुरक्षारक्षक लिपणे यांनी दुचाकी बाजुला घेण्यास दोघांना सांगितले.

यावरुन तरुणांनी लिपणे सोबत वाद घातला. त्यानंतर लिपणे यांना मारहाण केली. यात सुरक्षारक्षक लिपणे हे जखमी झाले असून, अनोळखी तरुण घटनास्थळावरुन फरार झाले. या घटनेची एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ.सतीश जोगस हे करीत आहेत.
 

Web Title: The assassin's assassination