एकलहरे येथे चौघांवर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 01:18 IST2021-04-05T01:17:29+5:302021-04-05T01:18:28+5:30

एकलहरा गेट, निर्मल सोसायटी येथे तिघांना टोळक्याने चाकूने वार करुन जखमी केले.

Assassination of four at Ekalhare | एकलहरे येथे चौघांवर प्राणघातक हल्ला

एकलहरे येथे चौघांवर प्राणघातक हल्ला

ठळक मुद्देहल्लेखोरांचा शोध सुरू : टोळक्याकडून चाकूने वार

नाशिकरोड : एकलहरा गेट, निर्मल सोसायटी येथे तिघांना टोळक्याने चाकूने वार करुन जखमी केले.
जेलरोड पंचक येथील अशोक बबन रांधवन यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्रवारी रात्री मित्र हरीश पाटील याला सोडविण्यास गेलेले असतांना   संजय दिलीप जाधव (रा. ट्रॅक्शनजवळ)  सुधीर पगारे, संदीप बागूल, अजय बागूल, सागर सोनवणे, विशाल सोनवणे, राहुल म्हस्के, अक्षय म्हस्के व त्यांचे तीन-चार साथीदार यांनी  शिवीगाळ करुन लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी मित्र हरीश पाटील व समाधान बोराळे हे मदतीस आले असता त्यांना तसेच राहुल राजेंद्र साठे, शंकर मल्लेश बाली यांनाही या संशयितांनी मारहाण केल्याचे फिर्यादित म्हटले आहे.
तपोवनरोडवर बालिकेचा मृत्यू
नाशिकरोड : तपोवनरोडवरील पोतदार शाळेजवळ राहणारी दीड वर्षाची मुलगी स्वरा रवि लोणकर ही शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास घरासमोर अंगणात खेळत असताना पडल्याने जखमी झाली. जखमी स्वरा हिला वडील रवि लोणकर यांनी बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचार सुरू असताना दुपारी अडीचच्या सुमारास तिचे निधन झाले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Assassination of four at Ekalhare