आशा कार्यकर्तीवर प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 00:39 IST2018-08-31T00:39:17+5:302018-08-31T00:39:32+5:30
दिंझेरी : तालुक्यातील कोकणगाव येथील सामाजिक आरोग्य (आशा) कार्यकर्तीवर प्राणघातक हल्ला झाला असून त्यांना जिल्हा रु ग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान हा प्रकार एकतर्फी प्रेमातून झाल्याची चर्चा असून हल्लेखोरानेही विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

आशा कार्यकर्तीवर प्राणघातक हल्ला
दिंझेरी : तालुक्यातील कोकणगाव येथील सामाजिक आरोग्य (आशा) कार्यकर्तीवर प्राणघातक हल्ला झाला असून त्यांना जिल्हा रु ग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान हा प्रकार एकतर्फी प्रेमातून झाल्याची चर्चा असून हल्लेखोरानेही विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
कोकणगाव बुद्रूक येथील आशा कार्यकर्तीवर बुधवारी दुपारी गावातीलच गोपाळ पागे याने मोबाईल नंबर देत नाही या कारणारून घरात घुसून चाकू हल्ला केला. आरोपीने यापूर्वीही सदर कार्यकर्तीला त्रास दिला होता. याबाबत दिंडोरी पोलीस ठाण्यात त्याच्या विरु द्ध तक्र ार करण्यात आली होती असे समजते. सदर जखमी यांना नाशिक येथे जिल्हा रु ग्णालयात दाखल केले असून तिच्यावर शस्त्रक्रि या करण्यात आल्याचे समजते. दरम्यान आरोपी गोपाळ पागे यानेही सकाळी विषप्राशन केल्याचे आढळून आला. त्याला तातडीने उपचारासाठी जिल्हा रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिंडोरी पोलिसांनी आरोपी गोपाळ पागे याचे विरु द्ध गुन्हा दाखल केला आहे.