शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

अटी शर्तींसह क्लासेस सुरु करण्यास परवानगीसाठी पीसीसीडीएचे पालकमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 7:22 PM

लॉकडाऊन मुळे बंद असल्याने छोटे व मध्यम क्लासेस संचालकांचे आर्थिक हाल होत असून फिजिकल डिस्टंन्सिंगचे पालन करून तसेच कोरोना प्रतिबंधात्मक मास्क व सॅनिटायझर सारख्या साहित्याचा वापर करून  खासगी क्लासेस चालकांना त्यांचे क्लासेस सुरू करण्याची परवानगी देण्याची मागणी नाशिक जिल्हा खासगी क्लासेस संचालक संघटनेने केली आहे.

ठळक मुद्देअटी शर्तींसह क्लासेस सुरु करण्याच्या परवानगी द्यावीपीसीसीडीएचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना साकडे

नाशिक :  गेल्या चार महिन्यांपासून लॉकडाऊन मुळे बंद असल्याने छोटे व मध्यम क्लासेस संचालकांचे आर्थिक हाल होत असून फिजिकल डिस्टंन्सिंगचे पालन करून तसेच कोरोना प्रतिबंधात्मक मास्क व सॅनिटायझर सारख्या साहित्याचा वापर करून  खासगी क्लासेस चालकांना त्यांचे क्लासेस सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी याठी खासगी कोचिंग क्लासेस संचालक सघनेने पालकमंत्र्यांना साकडे घातले आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना केल्या तर  दहावी, बारावी व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मोठ्या​ विद्यार्थ्यांचे पालक विद्यार्थ्यांना क्लासमध्ये पाठवायला तयार आहेत. परंतु शासनाची परवानगी नसल्याने अनेक क्लासेस संचालकांना क्लास घेता येत नाहीत. त्यामुळे येत्या एक जुलैपासून शाळा कॉलेजप्रमाणे, असे खासही क्लासेसही सुरु करण्यास शासनाने परवानगी द्यावी या मागणीसाठी नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्यावतीने रविवारी (दि.21) राज्याचे अन्नपुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ  यांना निवेदन देण्यात आले. यावेळी क्लासेस सुरु करण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन भूजबळ यांनी क्लासेस संचालकांना दिले आहे.  दरम्यान, कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कॉम्पुटर व टाईपिंग क्लास सुरू करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले पत्रही पालकमंत्र्यांना देण्यात आले. यावेळी संघटनचे जिल्हाध्यक्ष जयंत मुळे, सचिव लोकेश पारख, उपाध्यक्ष मुकुंद रनाळकर, सहसचिव संजय कुलकर्णी, गंगापूररोड विभागप्रमुख सचिन जाधव, पंचवटी विभागप्रमुख उदय शिरोडे, शाम महाजन, विनायक हिरे, प्रदिप येवला, दिपक जाधव, कल्पेश जेजुरकर आदी क्लासेसचे संचालक उपस्थित होते.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकChagan Bhujbalछगन भुजबळStudentविद्यार्थीTeacherशिक्षक