पिंपळगांव लेप रेणुका देवी मंदिरात अष्टमी महायज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2020 01:01 IST2020-10-24T22:25:55+5:302020-10-25T01:01:58+5:30
पिंपळगांव लेप : येथील रेणुका देवी मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्ताने अष्टमी महायज्ञ झाला.

पिंपळगांव लेप रेणुका देवी मंदिरात अष्टमी महायज्ञ
पिंपळगांव लेप : येथील रेणुका देवी मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्ताने अष्टमी महायज्ञ झाला.
यावर्षी कोरोनाने नवरात्र उत्सव अगदी साध्या पध्दतीने साजरा केला जात आहे. कोरोनाने अनेक वर्षांची नऊ दिवसांच्या महाआरत्या, गोंधळ, जागरण आदी धार्मिक कार्यक्रमांची परंपरा यंदा खंडीत झाल्याने भाविकांचा हिरमोड झाला आहे. देवी मंदिर परिसरात विद्युत रोषणाई केली गेली होती, मात्र भाविकाविना परिसर सुना सुना आहे.
धार्मिक परंपरेप्रमाणे साध्या पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा केला जात असतांना अष्टमी यज्ञ करण्यात आला. यज्ञपूजा मिलिंद सबनीस, माणिक रसाळ, निलेश देव्हडराव, दिलीप दौंडे, भावराव दौंडे, आप्पा दौंडे यांच्याहस्ते सपत्नीक करण्यात आली.