शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
3
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
4
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
5
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
6
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
7
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
8
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
9
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

अशोक कुमावत यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 4:52 PM

नाशिक : येथे राष्ट्रपती पुरस्कार विजेते, कवी, शिक्षक अशोक कुमावत यांच्या उठा तुम्हीही जिंकणारच या पुस्तक सोहळ्याच्या प्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, माजी आमदार बाळासाहेब सानप, पुनम मोगरे,  प्रियंका माने, डॉ.संदीप भानोसे, धनंजय माने, दिगंबर मोगरे,  शिवाजी कारवाळ, पंडित कुमावत, बाळासाहेब कुमावत,  विलास पोतदार, कवी, लेखक प्रा.राज शेळके, लेखक अशोक कुमावत आदी मान्यवर उपस्थित होते.

ठळक मुद्दे लेखक अशोक कुमावत यांचा सपत्नीक सत्कार केला.

नाशिक : येथे राष्ट्रपती पुरस्कार विजेते, कवी, शिक्षक अशोक कुमावत यांच्या उठा तुम्हीही जिंकणारच या पुस्तक सोहळ्याच्या प्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, माजी आमदार बाळासाहेब सानप, पुनम मोगरे,  प्रियंका माने, डॉ.संदीप भानोसे, धनंजय माने, दिगंबर मोगरे,  शिवाजी कारवाळ, पंडित कुमावत, बाळासाहेब कुमावत,  विलास पोतदार, कवी, लेखक प्रा.राज शेळके, लेखक अशोक कुमावत आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्ञानेश्वरी, तुकारामगाथा, भारताचे संविधान, गीता, भागवत, महात्मा फुले, कविवर्य कुसुमाग्रज यांच्या ग्रंथांचे पूजन प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत करण्यात आले.'उठा तुम्हीही जिंकणारच' या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करून लेखक अशोक कुमावत यांचा सपत्नीक सत्कार केला.यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी लीना बनसोडे यांनी आपल्या मनोगतातुन उठा तुम्हीही जिंकणारच या पुस्तकाविषयी गौरवोद्गार काढत हे पुस्तक इतिहास घडवत अनेकांना सकारात्मक प्रेरणा देईल. या प्रेरणादायी लेखमालेतुन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लेखकाचे लेख सोसियल माध्यमातून अनेकां पर्यंत पोहचले आहे. जग बदलू पाहणाऱ्या कर्तृत्वाची संघर्षगाथा म्हणजे 'उठा तुम्हीही जिंकणारच'हे पुस्तक साहित्यक्षेत्रात मानाचं स्थान मिळविणार यात शंका नाही.नाशिकचे उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, माजी आमदार बाळासाहेब सानप, जिल्हा क्रीडा अधिकारी मा.रवींद्र नाईक यांनीही मनोगतातून पुस्तकाच्या यशाबद्दल शुभेच्छा देत वाचन संस्कृतीस यातून चालना मिळेल. तरुणांना विविध प्रकारच्या क्षेत्रातील व्यक्तींच्या जीवनप्रवासाबद्दल माहिती होईल.कार्यक्रमास संतोष बेलदार, राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त नामदेव बेलदार, मुख्याध्यापक भगवान पाटील, दिगंबर बागड, दामोदर बच्छाव, भूषण कुमावत, दिलीप कुमावत, विमल कुमावत, निकिता कुमावत, साक्षी कुमावत, प्रथमेश बेलदार, अथर्व कुमावत आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रसिद्ध साहित्यिक रविंद्र मालूनजकर यांनी तर आभार नामदेव बेलदार यांनी केले. 

टॅग्स :sinnar-acसिन्नरMLAआमदार