Ashok Kharat News: शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या भोंदू बाबा अशोक खरातच्या पत्नीने पहिल्यांदाच मौन सोडले. अशोक खरातचे महिलांसोबत संबंध ठेवतानाचे असंख्य व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागलेले असताना त्याच्या पत्नीने मात्र त्याला फसवण्यात आल्याचा आरोप केला आहे. काही जवळच्या लोकांनी त्याच्या पाठीत खंजीर खुपसला असे खरातचे पत्नीचे म्हणणे आहे.
अशोक खरात याच्याशी संबंधित आणखी अनेक वादग्रस्त व्हिडीओ हाती लागल्याने अशा व्हिडीओंची संख्या १०० हून अधिक झाल्याची चर्चा आहे. अशोक खरातच्या अत्याचारांना बळी पडलेल्या पीडितांनी चौकशीसाठी पुढे यावे, त्यांची नावे गोपनीय ठेवून संरक्षण देण्यात येईल, असे आवाहन पोलिस यंत्रणेने केले आहे. खरात याच्याशी सातत्याने संपर्कात असणाऱ्यांचे कॉल डिटेल्सदेखील तपासण्यात येणार आहेत. याच दरम्यान खरातच्या पत्नीने एक विधान केले आहे.
अशोक खरातच्या पत्नीचा आरोप काय?
हिंदुस्थान टाइम्स या वृत्तपत्राशी बोलताना अशोक खरातची पत्नी कल्पना यांनी सांगितले की, "माझे पती काही व्यावसायिक किंवा तज्ज्ञ ज्योतिषी नाहीत. खूप जवळच्या काही सहकाऱ्यांनी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यांची प्रतिमा उद्ध्वस्त करण्यासाठी हे करण्यात आले आहे."
कल्पना खरात यांच्या व्यतिरिक्त कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने या प्रकरणावर भाष्य केलेले नाही. अशोक खरात याच्या जवळच्या व्यक्तींनीही याबद्दल मौनच बाळगलेले आहे. मात्र, या प्रकरणाने महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. अनेक मोठ्या नेत्यांसोबतचे खरातचे फोटोंनी चर्चांना हवाच मिळू लागली आहे.
नगरसेविकेच्या पतीची एसआयटीकडून चौकशी
एसआयटी पथकाने शुक्रवारी (२० मार्च) एका नगरसेविकेच्या पतीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केल्याचे समजते. राजकीय लागेबांधे निर्माण करण्यासह महापालिका निवडणुकीसाठी या व्यक्तीने मध्यस्ती केल्यामुळेच त्याची चौकशी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
अल्पवयीन मुलीवर केबल टेस्टरने भयंकर उपचार
इंटरनेट आणि केबल जोडण्याच्या उपकरणांच्या साहाय्याने एका अल्पवयीन मुलीवर केलेल्या अघोरी उपचारांचा व्हिडीओ समोर आल्याचे सांगण्यात येत असून, त्यामुळे या प्रकरणाला अधिक गंभीर वळण मिळाले आहे.
समोर आलेल्या व्हिडीओंमध्ये, खरात आपल्या कार्यालयात एका महिलेच्या समोर तिच्या अल्पवयीन मुलीला टी-शर्ट वर करण्यास सांगतो.
त्यानंतर वैद्यकीय उपकरणांऐवजी चक्क 'इंटरनेट केबल क्रिंपिंग टूल' (केबल जोडण्याचे यंत्र) आणि 'केबल टेस्टर' यांसारख्या तांत्रिक साधनांनी त्या मुलीच्या पोटावर स्पर्श करत अघोरी उपचार करत असल्याचे भासवतो. उपकरणांचा वापर करून भोंदूगिरी करण्याचा प्रकारही यानिमित्ताने समोर आला आहे.
Web Summary : Ashok Kharat's wife claims he's framed by close associates. She denies his astrological expertise amid allegations of sexual exploitation and possession of controversial videos. Police urge victims to come forward. A councilor's husband is under investigation.
Web Summary : अशोक खरात की पत्नी का दावा है कि उन्हें करीबी सहयोगियों ने फंसाया है। यौन शोषण और विवादास्पद वीडियो के कब्जे के आरोपों के बीच उसने ज्योतिषीय विशेषज्ञता से इनकार किया। पुलिस ने पीड़ितों से आगे आने का आग्रह किया। एक पार्षद के पति जांच के दायरे में हैं।