नाशिक येथील अशोक खरात प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. त्याच्याविरोधात दहा महिलांनी गुन्हे दाखल केले असून पोलिसांनी आता त्याच्या मालमत्तांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे, एसआयटीने खरातच्या मुलालाही ताब्यात घेतले आहे. अशोक खरातला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याची पत्नी कल्पना खरात फरार झाल्या आहेत. आता शिर्डी पोलिसांनी त्यांच्याविरोधात मोठी कारवाई केली. कल्पना खरातविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली.
लुकआऊट नोटीसमुळे कल्पना खरातला परदेशात जाता येणार नाही. आता देशातील सर्वच विमानतळावरुन संबंधित व्यक्तीला विदेशी प्रवासाची बंदी घालण्यात आली आहे. शिर्डीत भोंदू अशोक खरातसह पत्नीवर शेतकऱ्याची फसवणूक आणि सावकारकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यानंतर खरातची पत्नी कल्पना खरात फरार झाल्या असून शिर्डी पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.
अशोक खरात अटकेआधी परदेशात पळून जाण्याच्या तयारीत होता. पण, पोलिसांनी त्यांला लगेच अटक केली. आता पत्नी कल्पना खरात बाहेरच्या देशात पळून जाण्याची भीती पोलिसांना होती. यामुळे पोलिसांनी लुकआऊट नोटीस काढली. मागील काही दिवसांपासून कल्पना खरात फरार असून पोलिस शोध घेत आहेत.
भोंदू अशोक खरातला ७ दिवसांची पोलीस कोठडी
नाशिकमधील लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी भोंदू अशोक खरात याची आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. आता न्यायालयाने त्याला ८ एप्रिलपर्यंत ७ दिवसांची पोलील कोठडी सुनावली आहे. एसआयटीने त्याला सुरक्षेच्या कारणाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर केले होते. तत्पूर्वी, एसआयटीने सुरक्षेच्या कारणास्तव न्यायालयाकडे व्हीसीद्वारे सुनावणीसाठी अर्ज केला होता. हा अर्ज न्यायालयाने मंजूर केला होता. यानंतर, व्हीसीद्वारेच त्याची सुनावणी पार पडली. त्याला आज पाचव्यांदा न्यायालयासमोर (VC च्या माध्यमाने) हजर करण्यात आले होते. खरेतर, खरातच्या दुसऱ्या एका गुन्ह्यासंदर्भात ही सुनावणी होती. पहिल्या गुन्ह्यात त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
Web Summary : Following fraud charges against Ashok Kharat, his wife, Kalpana, is absconding. Police issued a lookout notice fearing she might flee abroad. Ashok Kharat is in police custody, and investigations continue into the case.
Web Summary : अशोक खरात पर धोखाधड़ी के आरोपों के बाद, उनकी पत्नी कल्पना फरार है। पुलिस ने आशंका जताई है कि वह विदेश भाग सकती है, इसलिए लुकआउट नोटिस जारी किया गया है। अशोक खरात पुलिस हिरासत में हैं, और मामले की जांच जारी है।