शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

Ashok Kharat: एक चिंचोका १० हजार ते एक लाखांना विकायचा, खरात चमत्काराच्या नावाखाली कसा गंडवायचा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 17:21 IST

अशोक खरातच्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांबरोबरच त्यांच्या बोगस चमत्काराच्या कथाही आता समोर येऊ लागल्या आहेत. कोब्रा नाग, वाघाचे कातडे असल्या गोष्टी दाखवून खरात त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांना फसवायचा. 

अशोक खरातची काळी कृत्ये महाराष्ट्राभर पोहोचली आहेत. त्याने महिलांना कशा पद्धतीने भुलवले, त्यांना भीती घातली आणि कधी कधी धमकावून अत्याचार केले. याच खरातने बोगस चमत्कार दाखवून बोगस रत्ने आणि चिंचोकेही लाखोंना विकले. याबद्दलच्या चर्चा आता या गावात रंगल्या असून आणि पोलिसांच्या चौकशीतूनही धक्कादायक माहिती समोर येत आहे.   अशोक खरात हा मंदिर परिसरात नकली साप व वाघाचे कातडे ठेवून लोकांमध्ये भीती व प्रभाव निर्माण करत असे. याद्वारे अघोरी विधी करून संमोहनविद्येद्वारे त्याने लोकांकडून पैसे उकळल्याचे पुढे आले आहे. 

रिमोटवर चालणारा नाग, एक चिंचोका एक लाखात

हा साप (काहींनी सांगितल्यानुसार हा कोब्रा नाग होता) जिवंत सापासारखाच हुबेहुब होता. रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून त्याची हालचाल होत असल्याने लोकांचा विश्वास बसून बाबाचा चमत्कार वाटायचा.

त्याच प्रमाणे १०० रुपये किलो भावाने बाजारात मिळणारे रानटी चिचोक्यांना पॉलिश करून आणि मढवून अशोक खरात हा भाबड्या भाविकांना प्रती नग तब्बल १० हजार ते एक लाख रुपयांना विकायचा. असाच प्रकार तो नकली खडे व रत्ने असली म्हणून विकताना करायचा असेही तक्रारीत म्हटले आहे.

"...तर जिवंत सोडणार नाही"

विकृत अशोक खरात याचे कारनामे त्याच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने कॅमेऱ्यात शूट केले. त्याच्या कार्यालयातच त्याने स्पाय कॅम बसवले आणि खरातचे विकृत चाळे कैद केल्याचे आता पुढे येत आहे. हा प्रकार कळल्यानंतर खरात याने त्याला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. "हे बाहेर सांगितले तर जिवंत सोडणार नाही," अशी धमकी खरातने त्याला दिली होती. 

हा कर्मचारी २०१९ पासून खरात याच्याकडे काम करीत होता. कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयात खरात नसताना सायंकाळी मित्राला बोलावून त्याने छुपा कॅमेरा बसवला होता. त्यानंतर अनैतिक, अघोरी प्रकार होतात का याची खात्री करण्यासाठी चित्रण तपासले असता तो हादरला. हा सगळा प्रकार समजल्यानंतर त्याने चित्रीत झालेले सर्व व्हिडिओ ताब्यात घेतले होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Ashok Kharat: Fake miracles, selling seeds for lakhs exposed.

Web Summary : Ashok Kharat allegedly defrauded people by staging miracles, selling fake gems and seeds for exorbitant prices. He used fear tactics, including fake snakes, to manipulate victims. A former employee secretly filmed Kharat's activities but received death threats.
टॅग्स :Ashok Kharatअशोक खरातSexual abuseलैंगिक शोषणCrime Newsगुन्हेगारीNashikनाशिकsexual harassmentलैंगिक छळ