शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

आषाढी वारी, संपदा सोहळा । नावडे मनाला, लागला टिळा पंढरीचा।।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 1:41 AM

वारी माझे जीवनातील आनंदाचे पर्व आहे. ‘आपुल्या माहेरा जाईन मी आता। निरोप या संता हाती आला।।’ या उक्तीप्रमाणे महाराष्ट्रातील लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने चालू लागतात. प्रत्येक मनुष्याला जीवनामध्ये सुखाची अपेक्षा असते, परंतु संसारामध्ये काबाडकष्ट करून थकलेला वारकरी ज्यावेळेस सुखाची अपेक्षा करतो तेव्हा त्याला आपल्या माहेराची आठवण येते.

संभाजी महाराज बिरारी, कंधानेकर

वारी माझे जीवनातील आनंदाचे पर्व आहे. ‘आपुल्या माहेरा जाईन मी आता। निरोप या संता हाती आला।।’ या उक्तीप्रमाणे महाराष्ट्रातील लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने चालू लागतात. प्रत्येक मनुष्याला जीवनामध्ये सुखाची अपेक्षा असते, परंतु संसारामध्ये काबाडकष्ट करून थकलेला वारकरी ज्यावेळेस सुखाची अपेक्षा करतो तेव्हा त्याला आपल्या माहेराची आठवण येते. सुखरूप ऐसा दूजा कोण सांगा। माझ्या पांडुरंगा सारीखाजो।। आणि पंढरीचा पांडुरंग परमात्मासुद्धा भक्ताची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतो. वाट पाहे उभा भेटीची आवडी। कृपाळू तातडी उतावीळ।। पांडुरंगाचं आणि वारकऱ्याचं नातं म्हणजे बापलेकी समान आहे. सासरी नांदायला गेलेल्या मुलीला जशी दीपावली आणि अक्षयतृतीयेला माहेराहून भाऊ मला नेण्यासाठी येईल, चार-आठ दिवस माहेराला सुखाने राहील, तशीच अपेक्षा वारकऱ्यांची असते. तुका म्हणे मज आठवा। मूळ लवकरी पाठवा।। मनुष्य घर सोडून बाहेर गेला की, त्याला घरची आठवण नक्की येते. परंतु महाराष्ट्रातील वारकरी एकदा पंढरीच्या दिशेने चालू लागला की, त्याला घरची आठवण येत नाही, हा लाखो वारकºयांचा अनुभव आहे. घरासारखी व्यवस्था वारीत नसते. अप्राप्त परिस्थितीतसुद्धा वारकºयांच्या चेहºयावरती आनंद दिसतो. ज्ञानदेव तुकाराम... या भजनाचा आनंद घेत घेत वारकरी पंढरीच्या दिशेने चालतो. एकदा या पंढरीच्या वारीची जिवाला ओढ लागली की, प्रत्येक वर्षी वारीला जावे ही अपेक्षा मनामध्ये असते. मीसुद्धा आषाढी व कार्तिकी वारीची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतो. आषाढी वारी ‘संपदा सोहळा नावडे मनाला। लागला टिळा पंढरीचा।। जावे पंढरीशी आवडे मनाशी। कधी एकादशी आषाढी हे।।’ आषाढी व कार्तिकी हे वैष्णवांचे बाजार आहे. तसेच ‘आषाढी निकट। आला कार्तिकीचा हाट।।’ शेतकरी एखाद्या पिकाचे पैसे आले, तर जसा वर्षभर पुरेल असे सामान भरून ठेवतो तसे वारकरी पंढरीच्या आषाढ व कार्तिक वारीला गेल्यावर वर्षभरासाठीचा भक्ती, ज्ञान, वैराग्य व प्रेमाचा बाजार करतात, त्यामुळे वारकरी भाविक यांना संसारातील उद्वेग जाणवत नाही. माणुसकीचा धर्म शिकवणारी वारी आहे. जात-पात, भेद-भाव, उच्च-नीच, वक्ते-श्रोते, गरीब-श्रीमंत याचा मेळावा म्हणजे पंढरीची वारी आहे.पांडुरंगाचे दर्शन घडावे हाच त्यांचा दृढ निश्चय असतो. या वारीत अनेक ज्येष्ठ नागरिक असतात. चालताना चिखल, पाऊस यामुळे चपला तुटतात तरीही अनवाणी पायांनी मुखी हरिनामाचा गजर करीत दिंड्या पुढे जात असतात. भगव्या पताका खांद्यावरी घेऊन ‘पांडुरंग हरी ज्ञानोबा माउली तुकाराम’ असा जयघोष सुरू असतो. मुक्कामाच्या ठिकाणी जे काही मिळेल ते खाऊन सकाळी पहाटे उठून पुन्हा वारीत सहभागी होतात. दररोजचा दिनक्रम ठरलेला असतो.जग, जीव, जनार्दन जाणून घेण्याची संधी म्हणजे वारी आहे. सामुदायिक पंगतीतील भोजन किती आनंददायी व ऊर्जा देणारे आहे हे कळते. आपले वैशिष्ट्य विसरून समरस होणे, आपला अहंकार बाजूला ठेवून जगणे, चालणे म्हणजे वारी होय. मनुष्याने देवाकडे केलेला प्रवास हा वारी शब्दाचा अर्थ आहे. केवळ पायी चालणे म्हणजे वारी होत नाही. आळंदी येथे लहानपणी वारकरी शिक्षणासाठी असल्यामुळे वारकरी साधना व उपक्र म मनात व नसानसात घर करून बसली आहे, त्यामुळे पंढरीची वारी हा वारकरी मंडळीचा साधन मार्गातील महत्त्वाचा घटक आहे. ‘जो करतो वारी। मी त्याची येरझार सारी।।’ तसेच ‘जो करतो पंढरीची वारी। तो काळाला मागे सारी।।’ पंढरीची वारी अनेक प्रकारची आहे, विधीची वारी नियम म्हणून, रु ढीची वारी आई-वडिलांची आज्ञा पालनार्थ, आवडीची वारी भक्तीची आवड म्हणून, ‘मज भक्तिची आवडी। सेवा व्हावी ऐसी जोडी।।’ सकाम वारी म्हणजे फल प्राप्त्यर्थ, तर निष्काम वारी जीवनमुक्तीचे सुख प्राप्त्यर्थ, अर्थात पंढरीची वारी एक साधना आहे आणि अशी वारी ज्यांना घडते ते वारकरी मोक्षाचे अधिकारी होतात, असे तुकाराम महाराज म्हणतात. पंढरीचे वारकरी। ते अधिकारी मोक्षाचे।।(लेखक अ. भा. वारकरी  मंडळाचे पदाधिकारी आहेत)

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीAshadhi Ekadashiआषाढी एकादशी