आषाढी अगोदरच पांडुरंग पावला, अन् वारकरी शेतीत रमला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 17:59 IST2020-06-28T17:58:18+5:302020-06-28T17:59:26+5:30
जळगाव नेऊर : आषाढ महिना लागला की, वारकऱ्यांना वेध लागतात आषाढी एकादशीच्या पंढरीच्या वारीचे, वारीत जाणारे वारकरी मोठ्या प्रमाणात शेतकरीच असतात, त्यामुळे बहुतेक शेतकरी वेळेवर पाऊस झाला तर पेरणी करून पंढरीच्या वारीत जातात.

आषाढी अगोदरच पांडुरंग पावला, अन् वारकरी शेतीत रमला
जळगाव नेऊर : आषाढ महिना लागला की, वारकऱ्यांना वेध लागतात आषाढी एकादशीच्या पंढरीच्या वारीचे, वारीत जाणारे वारकरी मोठ्या प्रमाणात शेतकरीच असतात, त्यामुळे बहुतेक शेतकरी वेळेवर पाऊस झाला तर पेरणी करून पंढरीच्या वारीत जातात.
कधी कधी तर एकादशी होऊन गेली आणि गुरुपौर्णिमेला घरी परतण्याची वेळ आली तरी पाऊस नसतो तेव्हा तो जड पावलांनी माघारी फिरतो, पण वारीत सारखी घरचीच चिंता त्याला असते. यावर्षी पाऊस वेळेवर झाल्याने शेतकºयांनी मृग नक्षत्रात पेरणी केली पण लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर नगरीत यावर्षी महाराष्ट्रात कोरोना संसर्ग साथीच्या थैमानाने वारकºयांना पंढरीला जाता आले नाही. मृग नक्षत्रात पावसावर पेरण्या केल्या पण त्यानंतर पावसाने उघडीप दिली. त्यात सोयाबीन बियाणे न उगवल्याने शेतकºयाची चिंता वाढतच गेली, पण पावसाने मात्र शेतकरी सुखावला असल्याने वारीला जाता आलं नाही तरी वारकरी मात्र विठूनामाच्या भक्तीत शेतीत हातभार लावत होता आणि पावसासाठी आतुरतेने पांडुरंगाचे नामस्मरण करीत आभाळाकडे बघत होता, सोमवारी नक्षत्र बदलले आणि वातावरणात बदल होऊन जोड नक्षत्रावर पाऊस २५ ते २७ जून सर्वत्र बरसला आणि सुकू लागलेली पिके टवकारली, पिकास जीवदान मिळाले, सर्व शेतकरी पुन्हा एकदा आपल्या श्रद्धेच्या सागरात पांडुरंगाच्या भक्तिरसात अथांग डुबला. तसेच महाराष्ट्राला कोरोनातून मुक्त करण्याचं साकडं पांडुरंग चरणी वारकºयांनी घातलं.
प्रत्येक वारकºयाला वाटते की आषाढी-कार्तिकीला पांडुरंगाचे दर्शन व्हावे, परंतु कोरोना साथीच्या आजाराने पांडुरंगाला विसरावे लागले, शरीराने पांडुरंगाला भेटता आले नाही पण मनाने, अंत:करणाने पांडुरंगाचे दर्शन करू शकलो, पांडुरंगाच्या कृपेने चांगला पाऊस झाला आणि पिके धरू लागली आहेत. तसेच कोरोनाच्या साथीतून मुक्त करण्याचे पांडुरंगाला साकडे घातले आहे.
- श्याम महाराज ठोंबरे, पुरणगाव.