शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
3
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
5
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
6
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
7
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
8
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
9
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
10
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
11
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
12
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
13
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
14
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
15
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
16
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
17
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
18
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
19
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
20
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे

पांगरी येथे कृत्रिम पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 11:14 PM

सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे अनियमित वीजपुरवठा व अतिरिक्त भारनियमनामुळे पांगरीकरांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नळ पाणीपुरवठा होण्याकरिता पंधरा ते वीस दिवस लागत असल्याने पाणी मिळविण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देमहिलांची पायपीट । अनियमित वीजपुरवठ्याचा परिणाम

पांगरी : सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे अनियमित वीजपुरवठा व अतिरिक्त भारनियमनामुळे पांगरीकरांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नळ पाणीपुरवठा होण्याकरिता पंधरा ते वीस दिवस लागत असल्याने पाणी मिळविण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत असल्याचे चित्र आहे.विजेचे भारनियमन तसेच वीज असल्यास त्यावेळी अत्यंत कमी दाबाने होणारा वीजपुरवठा यामुळे जलकुंभ भरण्यासाठी दोन ते चार दिवस लागत असल्याने पाणीपुरवठा करताना अडचणी निर्माण होत आहे. पांगरी गावात एकूण सुमारे वीसच्या आसपास चौक आहेत. एकदा जलकुंभ भरला तर चार ते पाच गल्ल्यांना पाणी जाते. तसेच पाणी सोडता त्यावेळी ही जलकुंभ भरणे चालू असते त्यामुळे दाब पूर्णपणे राहातो; परंतु असे ना होता अतिशय कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने जलकुंभ भरणे व पाणी सोडण्यासाठी कर्मचाऱ्याला ताळमेळ साधण्यासाठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे गावाला कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून, एक गल्लीला पाणी आल्यानंतर त्या गल्लीला परत पाणी येण्यासाठी पंधरा दिवसाचा कालावधी लागत आहे. समाधानकारक पाऊस झाल्याने विहीर, नदी-नाले, बंधारे सर्व भरले असल्याने यावर्षी गावाला पाणीटंचाई भासणार नाही, असे वाटत होते. लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी रवि पगार, आत्माराम पगार, संजय वारूळे, प्रकाशपांगारकर, सुनील निरगुडे, युनूस कादरी, नीलेश पगार, सुनील पेखळे आदींसह ग्रामस्थ व महिलावर्गाने केली आहे.वीजपुरवठा सुरू राहिला तर तो अत्यंत कमी दाबाने देण्यात येत असल्याने घरातील अनेक वीज उपकरणे सुरू होत नाही. त्यामुळे वीज असूनही तिचा उपयोग होत नाही. या कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे घरगुती वापराच्या उपकरणांचे नुकसान होत असून, त्यांचे जळण्याचे प्रमाणात वाढ झाली आहे. शेतकºयाला एक वाफा भरण्याकरिता अर्धा तास लागत आहे. तसेच वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढल्याने शेतापर्यंत पाणी पोहोचण्याचे अगोदर वीज गायब होते. त्यामुळे पाऊस चांगला होऊनही पिके चांगली येतील याचा भरवसा शेतकऱ्यांना राहिला नाही.नसून वीज व बदलते हवामानामुळे शेतकरी हैराण झाला आहे.कमी दाबाने होणाºया वीजपुरवठ्यामुळे जलकुंभ भरण्यास अडचण येत असल्याने ग्राम प्रशानाला पाणीपुरवठा करणे अवघड झाले आहे. वीज मंडळाने पूर्ण दाबाने वीजपुरवठा केल्यास कृत्रिम पाणीटंचाई दूर होणार आहे.- ज्ञानेश्वर पांगारकर,सरपंच, पांगरी

टॅग्स :Governmentसरकार