गुंगीचे औषध घेऊन येणाऱ्यास झोडगेत अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 00:24 IST2020-07-27T00:23:46+5:302020-07-27T00:24:07+5:30
झोडगे येथे महामार्गावर रविवारी धुळे येथून गुंगीचे औषध घेऊन येणाºया एकास पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून १२ हजार गोळ्यांसह ६३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी अन्न व औषध निरीक्षक चंद्रकांत अर्जुन मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

झोडगे येथे गुंगीचे औषध बाळगणारा संशयित मुज्जमील अन्सारीसह सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते, पोलीस कर्मचारी दिनेश शेरावते, तुषार अहिरे आदी.
मालेगाव मध्य : तालुक्यातील झोडगे येथे महामार्गावर रविवारी धुळे येथून गुंगीचे औषध घेऊन येणाºया एकास पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून १२ हजार गोळ्यांसह ६३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी अन्न व औषध निरीक्षक चंद्रकांत अर्जुन मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष पोलीस पथकाने रविवारी दुपारी बाराच्या सुमारास झोडगे गावालगतच्या कंधाणे रस्त्यालगत बंद हॉटेलसमोर धुळेहून मालेगावच्या दिशेने येत असलेल्या दुचाकीस्वार मुज्जमील हुसेन मोहंमद इसराईल अन्सारी (२९, रा. काजी प्लॉट, वडजईरोड धुळे) यास ताब्यात घेतले. त्याची तपासणी केली असता त्याच्याकडून अल्प्रोझालम नावाच्या गुंगीच्या २८ हजार ८०० रुपये किमतीच्या १२ हजार गोळ्या, दुचाकी व मोबाईल असा एकूण ६३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष पोलीस पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते, पोलीस शिपाई दिनेश शेरावते, तुषार अहिरे, दिनेश साबणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.