गर्भपाताच्या गोळ्या विकणाऱ्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 00:45 IST2018-12-08T00:44:54+5:302018-12-08T00:45:09+5:30
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय देता न येणाºया गर्भपाताच्या गोळीची बेकायदा विक्री करणाºया तिघांना सरकारवाडा पोलिसांनी अटक केली आहे.

गर्भपाताच्या गोळ्या विकणाऱ्यांना अटक
नाशिक : डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय देता न येणाºया गर्भपाताच्या गोळीची बेकायदा विक्री करणाºया तिघांना सरकारवाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर औषधे व सौंदर्यप्रसाधने कायद्यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिघांनाही न्यायालयात हजर करून अधिक तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली; परंतु न्यायालयाने तिघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
अडीच ते तीन महिन्यांचा गर्भपात करण्यासाठी सुचविल्या जाणाºया औषधांची डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय विक्री होत असल्याची माहिती सरकारवाडा पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार त्यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने कारवाई करून पंचवटीतील तारवालानगर येथील स्वप्निल देशमुख (३६), पेठ रोड परिसरातील विकास दिनकर चौधरी (३६), रमेश तुळशीराम पगारे या तिघांची अटक केली आहे. संशयित रमेश पगारे एम. जी. रोडवरील एका मेडिकलमध्ये काम करताना मेडिकल मालकाच्या अपरोक्ष सुरू विनाप्रिस्क्रिप्शन एमटीपी किट ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच देण्यात येणारी गर्भनिरोधक गोळी संशयित स्वप्निल देशमुख याच्याकडून आणून संबंधिताना देत होता. पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली असून, तिघांना अटक करून न्यायलयात हजर केले असता न्यायालयाने तिघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विलास शेळके पुढील तपास करीत आहेत.