शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

पाकिस्तानच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर लष्करी हद्दीचे छायाचित्रे टाकणारा परप्रांतीय ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 01:13 IST

नाशिक : शहरातील देवळाली लष्करी सैनिक रुग्णालयाच्या आवारात संध्याकाळच्या सुमारास फिरून मोबाईलद्वारे छायाचित्रे काढणा?्या परप्रांतीय युवकास सैन्याच्या जवानांनी ताब्यात घेत कसून चौकशी केली. त्याने काढलेली छायाचित्रे पाकिस्तानमधून हाताळल्या जाणा?्या एका व्हाट्सएपच्या ग्रुपमध्ये पाठविल्याचे तपासात पुढे आले आहे.

ठळक मुद्देपाकिस्तानच्या व्हाट्सएप ग्रुपवर लष्करी हद्दीचे छायाचित्रे टाकणारा परप्रांतीय ताब्यात

नाशिक : शहरातील देवळाली लष्करी सैनिक रुग्णालयाच्या आवारात संध्याकाळच्या सुमारास फिरून मोबाईलद्वारे छायाचित्रे काढणा?्या परप्रांतीय युवकास सैन्याच्या जवानांनी ताब्यात घेत कसून चौकशी केली. त्याने काढलेली छायाचित्रे पाकिस्तानमधून हाताळल्या जाणा?्या एका व्हाट्सएपच्या ग्रुपमध्ये पाठविल्याचे तपासात पुढे आले आहे. कर्तव्यावर असलेल्या जवानांनी संशयित संजीव कुमार (वय २१, रा.मूळ आलापूर, जि.गोपालगंज, बिहार ) यास शनिवारी (दि.3) संध्याकाळी देवळाली कॅम्प पोलिसांच्या हवाली केले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नाशिकरोड, देवळाली कॅम्प गांधीनगर हा भाग लष्कराच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. या भागात भारतीय तोफखाना केंद्र, आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कूल, स्कुल आॅफ आर्टिलरी देवळाली अशा प्रकारची महत्वाची लष्करी केंद्रे आहेत. त्यामुळे या भागात सवर्सामान्य व्यक्तींना प्रवेशबंदी असून या भागात कुठल्याहीप्रकारे विनापरवाना फोटो, व्हिडीओ काढण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसे सुचनाफलकसुध्दा या भागात लष्कराकडून लावण्यात आले आहेत. दरम्यान, लष्करी हद्दीत सुरू असलेल्या एका बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी राहणारा हा संशयित मजुर संजीव कुमार दीड ते दोन किलोमीटर लांब अंतर येऊन संध्याकाळी मोबाईलने सैनिकी रुग्णालयाच्या भागात फोटो काढताना जवानांना शुक्रवारी आढळून आला. त्यास तात्काळ ताब्यात घेत जवानांनी त्याचा मोबाईल जप्त केला आणि कसून चौकशी सुरु केली.संबंधित फोटो पाकिस्तान येथील व्हाट्सअप ग्रुप वर पाठविले असल्याचे तपासानंतर निदशर्नास आले. त्यानंतर संबधीत लष्करी त्यांनी येथील जबाबदार वरिष्ठ लष्करी अधिकारी यांच्या हा प्रकार निदशर्नास आणून दिला. सध्या देवळाली कॅम्प येथील रेल्वे स्टेशन जवळील चिंतामणी बस स्टॉप कॅम्प रोड परिसरात सुरू असलेल्या एका बांधकाम साईटवरील पत्र्याच्या शेडमध्ये हा संशयित संजीव वास्तव्यास आहे.याप्रकरणी संजीव यास ताब्यात घेत शनिवारी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांनी स्कुल आॅफ आर्टिलरी च्या मिडीयम बॅटरी येथील लष्करी अधिकारी ओमकार नाथ यादव(42) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शासकीय कार्यालयीन गोपनीयता अधिनियम1923च्या कलम 3 व 4प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPolice Stationपोलीस ठाणे