८७ गुन्हेगारांची धरपकड; पोलिसांचे 'कोम्बिंग' 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 16:41 IST2019-10-09T16:33:30+5:302019-10-09T16:41:13+5:30

रेकॉर्डवरील गुन्हेगार, नाकाबंदी, ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह, तडीपार गुंडांची तपासणी यावेळी करण्यात आली. तसेच परिसरातील हॉटेल, लॉजदेखील पोलिसांनी पिंजून काढले.

 Arrest of 87 criminals; 'Combing' of police | ८७ गुन्हेगारांची धरपकड; पोलिसांचे 'कोम्बिंग' 

८७ गुन्हेगारांची धरपकड; पोलिसांचे 'कोम्बिंग' 

ठळक मुद्दे८२ हॉटेल्स-ढाब्यांची तपासणीपोलिसांनी १०२ पैकी ८७ गुन्हेगारांवर कारवाई केली

नाशिक : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असून, माघारीनंतर निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारही निश्चित झाले आहे. यामुळे शहरात गुन्हेगारीच्या घटना घडू नये व कायदासुव्यवस्था टिकून रहावी, यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या आदेशान्वये सोमवारी मध्यरात्री शहरात आॅल आउटसह कॉम्बिंग आॅपरेशन राबविण्यात आले. यावेळी ८७ सराईत गुन्हेगारांची धरपकड करण्यात आली.

शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाले आहेत. नाकाबंदीपासून सर्वचप्रकारे पोलीस शहरातील गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. नांगरे-पाटील यांनी दिलेल्या आदेशानुसार सोमवारी (दि.७) रात्री १० वाजेपासून शहर-परिसरात आॅलआउट व कॉम्बिंग आॅपरेशन मोहीम राबविली गेली. पहाटे ३ वाजेपर्यंत चाललेल्या या महामोहिमेत शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्वच पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. यादरम्यान पोलीस ठाणेनिहाय यादीवरील गुन्हेगारांच्या घरी जाऊन पोलिसांनी १०२ पैकी ८७ गुन्हेगारांवर कारवाई केली.

नांदुरनाका, सिन्नरफाटा, म्हसरूळगाव, अंबड टी-पॉइंट, मालेगाव स्टॅण्ड, त्रिकोणी गार्डन, जेहान सर्कल, नारायणबापूनगर, पाथर्डी फाटा, संसरी नाका, फुलेनगर, पंचवटी, वाघाडी, मल्हारखाण झोपडपट्टी, सातपूर गाव या ठिकाणी रात्रभर पोलिसांनी गुन्हेगारांचा शोध घेतला. रेकॉर्डवरील गुन्हेगार, नाकाबंदी, ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह, तडीपार गुंडांची तपासणी यावेळी करण्यात आली. तसेच परिसरातील हॉटेल, लॉजदेखील पोलिसांनी पिंजून काढले.

८२ हॉटेल्स-ढाब्यांची तपासणी
आॅलआउट, कॉम्बिंग आॅपरेशनदरम्यान पोलिसांनी शहरातील ८२ हॉटेल्स, ढाबे तपासले त्यापैकी आक्षेपार्ह आढळून आलेल्या २८ विक्रेत्यांवर मुंबई पोलीस कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. नाकाबंदीमध्ये ३४० वाहने पहाटेपर्यंत पोलिसांकडून तपासली गेल्याचा दावा करण्यात आला आहे. संशयास्पद ५१ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करत पोलिसांनी १० हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला. तसेच शहर व परिसरातील ९६ टवाळखोरांवरही पोलिसांनी दंडुका चालविला.

Web Title:  Arrest of 87 criminals; 'Combing' of police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.