घरफोडीत ६५ हजारांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 18:00 IST2018-10-22T18:00:34+5:302018-10-22T18:00:58+5:30
सिन्नर येथील सरदवाडी रोडगलगतच्या उपनगरात वाजे लॉन्सच्या मागे शिवकमल अपार्टमेंट येथे बंद घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी दागिन्यांसह रोख रक्कमेसह सुमारे ६५ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेल्याच्या घटना घडली.

घरफोडीत ६५ हजारांचा ऐवज लंपास
येथील सरदवाडी रोड परिसरातील वाजे लॉन्सच्या मागे शिवकमल अर्पाटमेंट येथे प्रशांत शिवनाथ वाजे यांचा फ्लॅट आहे. वाजे कुटुंबीय फ्लॅटला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी फ्लॅटचा मागचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. कपाटारील ५० हजार रूपये रोख आणि १५ हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी वाजे यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरिक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हवालदार आर. एस. धुमाळ करत आहेत. पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.