दारू पिण्यास पैसे न दिल्याने शस्त्राने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 18:44 IST2018-10-07T18:42:16+5:302018-10-07T18:44:48+5:30

पंचवटी : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत, या कारणावरून कुरापत काढून जेलरोड परिसरातील युवकावर मानूर स्मशानभूमीनजीक धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी (दि.६) रात्रीच्या सुमारास घडली़ संकेत राजेंद्र शिंदे असे गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़

Arms warrant not to pay alcohol | दारू पिण्यास पैसे न दिल्याने शस्त्राने वार

दारू पिण्यास पैसे न दिल्याने शस्त्राने वार

ठळक मुद्दे पोटावर गंभीर वार करून जखमीआडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पंचवटी : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत, या कारणावरून कुरापत काढून जेलरोड परिसरातील युवकावर मानूर स्मशानभूमीनजीक धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी (दि.६) रात्रीच्या सुमारास घडली़ संकेत राजेंद्र शिंदे असे गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़

सातपूर येथील धनंजय इस्ते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शनिवारी मित्र संकेत शिंदे याच्यासोबत ते मानूर गावातील स्मशानभूमीजवळ उभे होते़ यावेळी संशयित दशरथ खानझोडे (४२, रा़ मानूरगाव) हा तिथे आला व त्याने दारू पिण्यासाठी पैसे मागितले़ मात्र, त्यास नकार दिल्याने संतप्त खानझोडे याने धारदार शस्त्राने शिंदेच्या पोटावर वार करून गंभीर जखमी केले़

या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात संशयित खानझोडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे़

Web Title: Arms warrant not to pay alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.