Armed movement of police at Trimbakeshwar | त्र्यंबकेश्वर येथे पोलिसांचे सशस्त्र संचलन
त्र्यंबकेश्वर शहरातून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सशस्त्र संचलन केले.

त्र्यंबकेश्वर : विधानसभा निवडणूक शांततेच्या वातावरणात पार पडावी, यासाठी शहरात पोलिसांनी सशस्त्र संचलन केले. त्र्यंबकेश्वरचे सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे, आरपीएसएफचे सहायक उपनिरीक्षक ए. के. मिंज, सहायक उपनिरीक्षक एच. ई. मीना आदी अधिकाऱ्यांसह ५४ जवान व त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे कर्मचारी व होमगार्ड असे एकूण ८५ कर्मचाऱ्यांनी संचलन केले. डॉ. आंबेडकर चौक येथून संचलनास सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज चौक, त्र्यंबकेश्वर मंदिर चौक, लक्ष्मीनारायण चौक, श्री कुशावर्त चौक ते तेली गल्ली, सुंदराबाई मठ, पाटील गल्ली ते कामथ चौक मार्गे संचलन करण्यात आले.


 


Web Title: Armed movement of police at Trimbakeshwar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.