शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

सिडकोमध्ये पोलिसांचे सशस्र संचलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 00:13 IST

गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी अंबड पोलिसांच्या वतीने सिडको भागात संचलन करण्यात आले. सध्याची करोनाची परिस्थिती विचारात घेता गणेशोत्सव व गणेश विसर्जन मिरवणूक यावर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत, याची माहिती नागरिकांना मिळावी आणि पोलिसांच्या सुरू असलेल्या कामाची माहिती मिळावी या उद्देशाने अंबड अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांचे संचलन करण्यात आले.

सिडको : गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी अंबड पोलिसांच्या वतीने सिडको भागात संचलन करण्यात आले. सध्याची करोनाची परिस्थिती विचारात घेता गणेशोत्सव व गणेश विसर्जन मिरवणूक यावर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत, याची माहिती नागरिकांना मिळावी आणि पोलिसांच्या सुरू असलेल्या कामाची माहिती मिळावी या उद्देशाने अंबड अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांचे संचलन करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक नखाते, अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक कुमार चौधरी, निरीक्षक कमलाकर जाधव यांच्यासह अधिकारी व कर्मचारयांबरोबर दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक सहभागी झाले होते.वडाळा, इंदिरानगरमध्ये पोलिसांचे संचलनइंदिरानगर : इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वतीने सण-उत्सव काळात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर जरब निर्माण करण्याच्या उद्देशाने वडाळा-इंदिरानगर परिसरात पोलिसांकडून शुक्रवारी (दि.२८) सशस्र संचलन करण्यात आले. श्री गणेश विसर्जन, मोहरमसह आगामी विविध सणांच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलिसांचे संचलन करण्यात आले. संचलनाची सुरुवात शंभर फुटी रस्त्यावरील पिंगळे चौक येथून सुरु वात करण्यात आली.इंदिरानगरमधील राजे छत्रपती चौक, सार्थकनगर बस थांबा, कैलासनगर बस थांबा वडाळा-पाथर्डी रस्ता आणि वडाळा गावातील झोपडपट्टी भागातील मांगिरबाबा चौक, महेबूबनगर, मुमताजनगर, सादीकनगर, पांढरी आई देवी चौक, खंडोबा चौक आदी परिसरातून पोलिसांनी शक्तिप्रदर्शन केले. यावेळी पोलीस उपायुक्त विजय खरात, सहायक आयुक्त अशोक नखाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्यासह दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथकाचे जवान सहभागी झाले होते.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयcidcoसिडकोGaneshotsavगणेशोत्सव