आंबेगावच्या सरपंचपदी अर्चना गीते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 00:26 IST2021-02-14T00:04:02+5:302021-02-14T00:26:45+5:30
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील आंबेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अर्चना मनोज गीते यांची तर अलका घनश्याम काळे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली.

आंबेगावच्या सरपंचपदी अर्चना गीते
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील आंबेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अर्चना मनोज गीते यांची तर अलका घनश्याम काळे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली.
निवडणूक निर्णय अधिकारी जराड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत सरपंचपदासाठी अर्चना गीते व उपसरपंचपदासाठी अलका काळे यांचे एक एक अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब गिते, शशिकांत गिते, अर्चना आव्हाड, आनंदा गीते, पुंडलिक गीते, मनोज गिते, अशोक गीते, सोमनाथ सांगळे, नितीन काळे, लक्ष्मण आव्हाड, भीमा आव्हाड, घनश्याम काळे यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार करून गुलालाची उधळण करण्यात आली.