शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना नववीत नापास करणाऱ्या शाळांना बसणार चाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 14:20 IST

शहरातील काही नामांकित शाळांकडून दहावीचा निकाल उंचावण्यासाठी नववीच्या वर्गातील  अभ्यासात कच्च्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना नापास करण्याचा प्रकार फोफावत चालला आहे. त्यामुळे राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न शाळांना नववीचा निकाल व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या फेरपरिक्षेचे नियोजन शिक्षण विभागाला सादर करणे अनिवार्य करण्यात आल्याने अशा शाळांना आता चाप बसणार  आहे. शिक्षण विभागाने या माध्यमातून केवळ निकाल नव्हे, तर विद्यार्थ्यांची गुणवत्ताही वाढविण्यासाठी संबधित शाळांचे कान टोचले असल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात होत आहे. 

ठळक मुद्दे निकाल उंचावण्यासाठी विद्यार्थ्यांना नापास करण्याचा प्रकार शाळाना लगाम लावण्यासाठी शिक्षण विभागाची कार्यवाही निकालासोबतच परीक्षेचे फेरनियोजन अनिवार्य

नाशिक : शहरातील काही नामांकित शाळांकडून दहावीचा निकाल उंचावण्यासाठी नववीच्या वर्गातील  अभ्यासात कच्च्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना नापास करण्याचा प्रकार फोफावत चालला आहे. त्यामुळे राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न शाळांना नववीचा निकाल व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या फेरपरिक्षेचे नियोजन शिक्षण विभागाला सादर करणे अनिवार्य करण्यात आल्याने अशा शाळांना आता चाप बसणार  आहे. शिक्षण विभागाने या माध्यमातून केवळ निकाल नव्हे, तर विद्यार्थ्यांची गुणवत्ताही वाढविण्यासाठी संबधित शाळांचे कान टोचले असल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात होत आहे. शिक्षण विभागाने आठवीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना उतीर्ण करावे, कोणत्याही विद्यार्थ्यांला अनुतीर्ण करू नये, असे सरकारी धोरण आहे. त्यामुळे आठवीपर्यंत उतीर्ण होणारे काही विद्यार्थी नववीच्या वर्गात अडखळतात. तर अनेक विद्यार्थी नववी उत्तीर्ण होण्याची क्षमता असतानाही केवळ दहावीच्या वर्गात कमी गुण मिळवतील अथवा अनुत्तीर्ण होतील या शक्यतेने अनेक विद्यार्थ्यांना नववीच्या परीक्षेतच अनुतीर्ण केले जातो. दहावीच्या वर्गातील कामगरी उत्तम दिसावी,  यासाठी शहरातील वेगवेगळ््या नामांकित शाळांकडून असे प्रकार घडत असल्याचे शिक्षण विभागाच्या निर्दशनास आले. तसेच पालकांकडूनही मोठ्या प्रमाणात तक्रारी होत असल्याने दोन वर्षांपूर्वी शिक्षण विभागाने नववीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची फेरपरिक्षा घेण्याचे आदेश दिला होता. जून  महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही परिक्षा घेणे बंधनकारण करण्यात आले होते. मात्र, अनेक शाळांनी या आदेशाला केराची टोपली दाखवत फेरपरिक्षा घेतलीच नाही. विद्यार्थ्यांना नववीत फेरपरिक्षेची संधी देण्याऐवजी दहावीचा निकाल शंभर टक्के लागावा, यासाठी बहुतांश शाळा नववीत अभ्यासात कच्च्या असणाºया विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करतात. शाळेचा निकाल कमी लागल्यास अथवा विद्यार्त्यांना कमी टक्के वारी मिळाल्यास नव्याने प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांच्या संख्येत आणि त्यांच्याकडून मिळणाºया डोनेशनमुळे शाळांच्या तिजोरीवर परिमाण होत असल्याने विद्यार्थ्यांना नववीच्या वर्गात नापास करण्याचे अथवा शाळा बदलण्यासाठी सांगण्याच प्रकार घडल्याच्या तक्रारी पालकांकडून करण्यात होत आहेत. त्यामुळे नववीत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात फेरपरिक्षा घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला असून सर्व शाळांनी  याविषयीचे नियोजन शिक्षण विभागाला सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.  

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकSchoolशाळाStudentविद्यार्थीEducationशिक्षणexamपरीक्षा