स्थायी समितीकडून अंदाजपत्रकास मंजुरी

By Admin | Updated: March 2, 2017 01:12 IST2017-03-02T01:11:54+5:302017-03-02T01:12:11+5:30

प्रशासनाने सादर केलेल्या ३७८.९९ कोटीच्या अंदाजपत्रकात ६ कोटींची वाढ करीत स्थायीने ३८४.९९ कोटींच्या अंदाजपत्रकास मंजुरी दिली.

Approval of budget from Standing Committee | स्थायी समितीकडून अंदाजपत्रकास मंजुरी

स्थायी समितीकडून अंदाजपत्रकास मंजुरी

मालेगाव : शहर स्वच्छतेवर भर, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, सार्वजनिक शौचालये, उत्पन्न वाढीसाठी मालमत्तेचे सर्वेक्षण, हजेरी केंद्रांच्या नूतनीकरणासाठी निधीची तरतूद व कुठलीही कर वाढ न करता, जमा-खर्चात ३५ लाखांची, मोबाइल टॉवर वसुली एक कोटी अशी किरकोळ दुरुस्ती सुचवत प्रशासनाने सादर केलेल्या ३७८.९९ कोटीच्या अंदाजपत्रकात ६ कोटींची वाढ करीत स्थायीने ३८४.९९ कोटींच्या अंदाजपत्रकास दीड दिवसाच्या चर्चेनंतर मंजुरी दिली. मंजूर अंदाजपत्रक महासभेपुढे सादर करण्यात येणार आहे.
गेल्या सोमवारी मनपा प्रशासनाने गेल्या वर्षीचे ४५२.७४ कोटींचे अंदाजपत्रक सादर केले होते. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा अंदाजपत्रकात कपात करण्यात आली आहे. प्रशासनाने फुगीर अंदाजपत्रक न सादर करता केवळ ३७८.९९ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले आहे. सन २०१७-१८ मध्ये महसुली उत्पन्न १७२.८१ कोटी धरण्यात आले आहे, तर प्रमुख बाबींवरचा खर्च १४०.९४ कोटी एवढा गृहीत धरुन अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले.
स्थायी समिती सभापती एजाज बेग व सदस्यांनी मंगळवार व बुधवार असे दीड दिवस चर्चा करून जमा-खर्चात ५० लाखांची, मोबाइल टॉवर वसुली एक कोटी, कत्तल खाना टेंडर एक कोटी ४० लाख, शौचालय उभारणीसाठी अधिकचा निधी अशी सुमारे ६ कोटींची वाढ सुचविली आहे. ३७८.९९ कोटींचे अंदाजपत्रक आता ३८४.९९ कोटींचे झाले आहे. मंजूर अंदाजपत्रक महासभेपुढे सादर करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Approval of budget from Standing Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.