शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

९८ ग्रामपंचायतीवर २१ प्रशासकांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 15:55 IST

सिन्नर : तालुक्यातील जवळपास ९८ ग्रामपंचायतीची मुदत जुलै व आॅगस्ट महिन्यात संपुष्टात आली आहे. कोरोनामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या असून त्यात राज्य शासनाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रशासक नियुक्तीचा अधिकार दिले आहे. मात्र त्यात पालकमंत्र्यांची शिफारस लक्षात घेण्याच्या सूचना होत्या. त्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व कांग्रेसच्या इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले होते. स्वातंत्र्य दिनाच्या पुर्वसंध्येला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शासकीय व्यक्तींंची प्रशासक म्हणून नियुक्ती होताच इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.

ठळक मुद्देसिन्नर : अन् इच्छुकांच्या अपेक्षांवर पडले पाणी !

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : तालुक्यातील जवळपास ९८ ग्रामपंचायतीची मुदत जुलै व आॅगस्ट महिन्यात संपुष्टात आली आहे. कोरोनामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या असून त्यात राज्य शासनाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रशासक नियुक्तीचा अधिकार दिले आहे. मात्र त्यात पालकमंत्र्यांची शिफारस लक्षात घेण्याच्या सूचना होत्या. त्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व कांग्रेसच्या इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले होते. स्वातंत्र्य दिनाच्या पुर्वसंध्येला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शासकीय व्यक्तींंची प्रशासक म्हणून नियुक्ती होताच इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.सिन्नर तालुक्यातील ९८ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून कोणाची नियुक्ती करावी, यावर उच्च न्यायालयापर्यंत वाद गेला. स्वातंत्र्य दिनानिमित्त होणाºया ध्वजारोहणाचा प्रश्न ऐरणीवर आल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी आदेश काढत मुदत संपलेल्या सर्व ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती केली आहे.कोरोनामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या, कोरोना दूर जाताच निवडणुका लागतील, त्यात आपण कशी बाजी मारू यासाठी राजकीय आडाखे गावस्तरावर बांधण्यात आले होते. प्रशासक पदाची धुरा आपल्या गटाच्या हाती पडल्यास निवडणुकीत पॅनल सहज विजयी होईल, या अपेक्षेने अनेकांनी आमदारांमार्फत पालकमंत्र्यांकडे फिल्डिंग लावली होती. तसेच काही इच्छुकांनी आप आपल्या पक्षामार्फत प्रयत्न सुरु केले होते. यावरून गावपातळीवर राजकारण चांगलेच पेटले होते. त्यात महाविकास आघाडीच्या शासनात सहभागी असलेल्या मित्र पक्षातील सर्व इच्छुक कामाला लागले होते. निवडणूका लांबणीवर पडल्याने सदरील ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याच्या हालचाली मागील दोन मिहन्यापासून सुरू होत्या. मात्र प्रशासक म्हणून कोणाची नियुक्ती करायची, असा पेच निर्माण झाला होता. जिल्हा परिषदेच्या सीईओंनी प्रशासकाची नियुक्ती करून चर्चेला विराम दिला आहे.तालुक्यातील ग्रामपंचायतीवर ग्रामपंचायत, कृषी, शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी, तसेच कृषी अधिकारी, प्रशासन अधिकारी, पर्यवेक्षिका, शाखा अभियंता यांची नियुक्ती झाली असून, मोठ्या ग्रामपंचायतींची जबाबदारी विस्तार अधिकाऱ्यांवर दिली गेली आहे. त्यामुळे तालुक्यातील ९८ ग्रामपंचायतींचे कामकाज आता २१ प्रशासकांमार्फत चालणार आहे. यातील अनेक प्रशासकास चार किंवा पाच ग्रामपंचायतीची जबाबदारी देण्यात आली आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक