कायमस्वरूपी शिक्षण उपसंचालकाची नेमणूक करा ; मुख्याध्यापक संघाची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 03:19 PM2020-08-09T15:19:15+5:302020-08-09T15:20:28+5:30

नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक पदावर कायमस्वरुपी अधिकाऱ्याची नियुक्ती होत नसल्याने शिक्षण विभागाला लागलेले ग्रहण लागल्याची भावना व्यक्त करीत नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाने शिक्षण उपसंचालक पदावर  कायमस्वरुपी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. 

Appoint Permanent Deputy Director of Education: Demand of Headmasters Association | कायमस्वरूपी शिक्षण उपसंचालकाची नेमणूक करा ; मुख्याध्यापक संघाची मागणी 

कायमस्वरूपी शिक्षण उपसंचालकाची नेमणूक करा ; मुख्याध्यापक संघाची मागणी 

googlenewsNext
ठळक मुद्देशिक्षण उपसंचालकपदी वारंवार प्रभारी अधिकारी अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या बदलल्याने कामकाज ठप्पनिर्णयक्षम अधिकारी नियुक्तीची मुख्याध्यापकांची मागणी

नाशिक : विभागीय शिक्षण उपसंचालक पदावर कायमस्वरुपी अधिकाऱ्याची नियुक्ती होत नसल्याने शिक्षण विभागाला लागलेले ग्रहण लागल्याची भावना व्यक्त करीत नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाने शिक्षण उपसंचालक पदावर  कायमस्वरुपी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. 
नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक पदावर जवळपास दोन वर्षांपासून प्रभारी अधिकाऱ्यांची नियुक्ती होत असून तेही सतत बदलत असतात. त्यामुळे सध्या उपसंचालक कार्यालयातील शालार्थ आयडीसह इतर कामकाज ठप्प झाल्याचा आरोप मुख्याध्यापकांनी केला आहे. कायमस्वरुपी उपसंचालक अधिकारी नसल्याने नाशिक विभागातील चारही जिल्ह्यांमध्ये पालक/शिक्षक/ मुख्याध्यापक/ संस्थाचालक यांची गैरसोय होत आहे. अनेकदा उपसंचालक कार्याळयात येऊनही त्यांचे काम होत नसल्याने वेळ, पैसा खर्च होतो. तसेच उपसंचालकाकडे दोन-तीन विभागांचे अतिरिक्त कार्यभार असल्याने ते पूर्ण वेळ उपसंचालक कार्यालयात येऊ शकत नाही जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिकच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिक्षकांना तासनतास उपसंचालकांची वाट बघत ताटकळत बसावे लागते. यापूर्वी  प्रभारी उपसंचालकांनी ऑनलाईन कामाची चांगली सुविधा उपलब्ध करून दिली होती पण एकाच महिन्यात दुसरे प्रभारी शिक्षण उपसंचालक आले व ही योजना बारगळली. त्यामुळे या कार्यालयास कायमस्वरुपी, निर्णयक्षम व शिक्षकांच्या समस्या सोडविणाऱ्या उपसंचालकाची नेमणूक करावी, अन्यथा १७ ऑगस्ट २०२० पासून मुख्याध्यापक संघ व सर्व सहयोगी संघटना रस्त्यावर उतरनून शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन करतील, असा इशाराही मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस.के.सावंत, कार्याध्यक्ष एस.बी.शिरसाठ, सचिव एस.बी. देशमुख यांनी महसुल आयुक्त राजाराम माने यांना दिले आहे.  

Web Title: Appoint Permanent Deputy Director of Education: Demand of Headmasters Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.