कविता गायनात अनुजा, हर्षिता, मनस्वी प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 01:27 IST2020-08-10T23:24:40+5:302020-08-11T01:27:15+5:30
नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या बालभवनतर्फे विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या आॅनलाइन गीतगायन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, या स्पर्धेत अनुजा चौधरी, हर्षिता बद्दर, मनस्वी जगझाप यांनी वेगवेगळ्या गटात प्रथम क्रमांक पटकविला आहे.

कविता गायनात अनुजा, हर्षिता, मनस्वी प्रथम
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या बालभवनतर्फे विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या आॅनलाइन गीतगायन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, या स्पर्धेत अनुजा चौधरी, हर्षिता बद्दर, मनस्वी जगझाप यांनी वेगवेगळ्या गटात प्रथम क्रमांक पटकविला आहे.
सार्वजनिक वाचनालयाच्या बालभवनातर्फे दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी पावसाळी कविता गायन स्पर्धा घेण्यात येतात. यंदा कोरोनाच्या संकटातही ही परंपरा अखंडित राखण्यासाठी आॅनलाइन कविका, गीतगायन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला असून, वेगवेगळ्या तीन गटांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांमधून या विजेत्यांची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत प्रत्येक विद्यार्थ्याला कविता गायन सादर करण्यासाठी दोन मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. या स्पर्धेचे गीता बागुल, अर्चना सूर्यवंशी यांनी परीक्षण केले होते. एकूण १४० स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला होता. त्यापैकी प्र्रथम, द्वितीय, तृतीय असे प्रत्येक गटात तीन व उत्तेजनार्थ असे एकूण १९ विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आल्याची माहिती बालभवनचे प्रमुख संजय करंजकर यांनी दिली. पारितोषिक विजेते सावाना बालभवनतर्फे पावसाळी स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, यात गट एकमध्ये अनुजा चौधरी प्रथम, मान्यता सोनावणे द्वितीय, राधा कापुरे हिला तृतीय, तर श्रीराज निकम, कामाक्षी सोनावणे, भाग्यश्री टिंभे, हेमंत आहिरे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आहे. गट दोनमध्ये हर्षिता बद्दर, रेवा कासार, काव्या देवरे यांना अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक व सोहम मोरे, दुर्वा उदागे व अवधुत गवळी यांना उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. तिसऱ्या गटात मनस्वी जगझाप, साई बत्तासे, चिन्मय गरुड यांनी अनुक्रम प्रथम, द्वितीय, तृतीय व प्रणव गवळी, स्वानंदी तिडके, वेदांत बोराडे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर झाले आहेत.