शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
3
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
5
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
6
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
7
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
8
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
9
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
10
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
11
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
13
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
14
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
15
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
16
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
17
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
18
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
19
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
20
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल

भडगावमध्ये परीक्षेपूर्वीच आढळली उत्तरपत्रिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 1:39 AM

नाशिक : तालुक्यातील कोळगाव येथील गोपीचंद पुना पाटील महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाटण्यापूर्वीच सर्व प्रश्नांची उत्तरे असलेल्या उत्तरपत्रिका व त्यांच्या झेरॉक्स कस्टडी रूममध्ये भरारी पथकाच्या धाडीत आढळून आल्या़ या धक्कादायक प्रकाराबाबत केंद्रसंचालक प्राचार्य राजेंद्र्र संभाजी पाटील, कर्मचारी अरविंद जगन्नाथ सावंत व शिपाई भरत तुकाराम पाटील यांच्याविरोधात भडगाव पोलीस ठाण्यात डाएटच्या प्राचार्य डॉ. मंजूषा क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

ठळक मुद्देकेंद्रसंचालकांसह तिघांवर गुन्हा प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिकेची झेरॉक्स काढण्याचा प्रकार

नाशिक : तालुक्यातील कोळगाव येथील गोपीचंद पुना पाटील महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाटण्यापूर्वीच सर्व प्रश्नांची उत्तरे असलेल्या उत्तरपत्रिका व त्यांच्या झेरॉक्स कस्टडी रूममध्ये भरारी पथकाच्या धाडीत आढळून आल्या़ या धक्कादायक प्रकाराबाबत केंद्रसंचालक प्राचार्य राजेंद्र्र संभाजी पाटील, कर्मचारी अरविंद जगन्नाथ सावंत व शिपाई भरत तुकाराम पाटील यांच्याविरोधात भडगाव पोलीस ठाण्यात डाएटच्या प्राचार्य डॉ. मंजूषा क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, परीक्षा केंद्रावर तयार उत्तरांचा प्रकार समोर आल्यानंतर येथील शिपायाने घटनास्थळावरून पळ काढला असून, पोलीस त्यासा शोध घेत आहेत.बारावीच्या परीक्षेला मंगळवारी इंग्रजी भाषेच्या पेपरने सुरुवात झाली असून, कॉपीमुक्त अभियानाची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी सकाळपासून भरारी पथकांनी अनेक केंद्रांवर अचानक धाडी टाकल्या होत्या़ त्यात जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य डॉ़ मंजूषा क्षीरसागर यांच्या पथकाने सकाळी ११़ १० वाजता भडगाव तालुक्यातील कोळगाव येथील गोपीचंद पुना पाटील महाविद्यालयात अचानक भेट दिली़ त्यावेळी खिडक्यांमधून विद्यार्थी कॉपी पुरविताना दिसून आले़ तर प्रश्नपत्रिका ठेवलेल्या कस्टडी रूममधून दोन विद्यार्थी पळताना दिसले़ त्याचवेळी केंद्राच्या बाजूला असलेल्या इमारतीच्या छतावर मोठ्या प्रमाणात जमाव जमल्याचे बघितल्यानंतर डाएटच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने गर्दी पांगविली़ त्याच दरम्यान कस्टडी रूममध्ये गेलेल दोन्ही विद्यार्थी मुले पार्टेशनच्या खोलीतून पसार झाले़ कस्टडी रुममधून विद्यार्थी निघाल्यामुळे डाएटच्या प्राचार्य क्षीरसागर यांना संशय आला व त्यांनी रूम उघडण्यासाठी सांगितले़ मात्र, चावी नसल्याचे सांगून केंद्रसंचालक राजेंद्र पाटील यांनी रूम उघडण्यास टाळाटाळ केली़ अखेर डायटच्या अधिकाऱ्यांनी विभागीय मंडळाची मदत घेतली असता विभागीय सचिव नितीन उपासणी यांनी अधिकाºयांना कस्टडी रूमची चावी सुपूर्द करण्याच्या सूचना केंद्रसंचालकांना केल्या. त्यानंतर दुसरी चावी मागवून खोली उघडण्यात आल्यानंतर या ठिकाणी परीक्षेला सुरुवात होण्यापूर्वीच उत्तरपत्रिका तयार करण्याचा धक्कादायक प्रकार सुरू असल्याचे समोर आले.याठिकाणी गोपणीय पद्धतीने ठेवण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये उत्तर लिहिलेली उत्तरपत्रिकादिसून आली़ तसेच झेरॉक्स मशीनमध्येही उत्तरांची प्रत अडकलेली पथकाच्या तपासणीत सापडली़ याप्रकरणी विभागीय मंडळाच्या सूचनेनुसार संबंधित कें द्रसंचलकांसह जबाबदार कर्मचाºयांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठविले उत्तर व प्रश्नपत्रिकाडाएट यांच्या पथकाला उत्तर लिहिलेल्या उत्तरपत्रिकेसोबत त्या रूममध्ये टेबलावर मोबाइल आढळून आला़ तो मोबाइल शाळेतील कर्मचारी अरविंद सावंत यांचा असल्याचे समोर आले़ त्याचे फिंगरप्रिंट लॉक उघडल्यानंतर पुन्हा धक्कादायक बाब समोर आली़ त्यात शिपाई भरत पाटील याने उत्तरपत्रिका पाठविल्याचे दिसून आले, तर सावंत यांच्याकडून उत्तर पाठविण्यात आल्याचे दिसले़, तर शिपाई भरत याला बोलावून तुझा मोबाइल कुठे आहे, अशी विचारणा केल्यानंतर त्याने गेटजवळ ठेवल्याचे सांगितले़ तो आणण्यास सांगितल्यानंतर त्याने तेथून पळ काढला़दरम्यान, संपूर्ण तपासणीनंतर डाएटच्या प्राचार्य यांनी भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली़ त्यानुसार केंद्रसंचालक राजेंद्र पाटील, अरविंद सावंत व भरत पाटील यांच्याविरुद्ध गैर प्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९८२ चा कायदा कलम ५ व ६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पांडुरंग सोनवणे हे करीत आहे.दरम्यान, संपूर्ण तपासणीनंतर डाएटच्या प्राचार्य यांनी भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली़ त्यानुसार केंद्रसंचालक राजेंद्र पाटील, अरविंद सावंत व भरत पाटील यांच्याविरुद्ध गैर प्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९८२ चा कायदा कलम ५ व ६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पांडुरंग सोनवणे हे करीत आहे.

टॅग्स :NashikनाशिकHSC / 12th Exam12वी परीक्षा