ठाकरे गटाला आणखी एक धक्का, माजी मंत्र्यांची कन्या भाजपच्या वाटेवर
By संजय पाठक | Updated: March 14, 2023 13:50 IST2023-03-14T13:49:21+5:302023-03-14T13:50:05+5:30
राज्यातील आणि शिवसेनेच्या एका जेष्ठ नेत्याच्या पुत्राकडून ठाकरे गटाला असा धक्का बसल्यानंतर आता नाशिकमध्ये देखील घोलप यांच्याकडून धक्का बसणार आहे.

ठाकरे गटाला आणखी एक धक्का, माजी मंत्र्यांची कन्या भाजपच्या वाटेवर
संजय पाठक
नाशिक- ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला असून माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांची कन्या तनुजा घोलप भाजपामध्ये प्रवेश करणार आहे आज दुपारी हा प्रवेश सोहळा मुंबईत होणार असून त्यासाठी तनुजा घोलप या मुंबईकडे रवाना झाल्या आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनी ही यास दुजोरा दिला आहे कालच शिवसेना नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता.
राज्यातील आणि शिवसेनेच्या एका जेष्ठ नेत्याच्या पुत्राकडून ठाकरे गटाला असा धक्का बसल्यानंतर आता नाशिकमध्ये देखील घोलप यांच्याकडून धक्का बसणार आहे. तनुजा घोलप यांनी या पूर्वी शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी प्रयत्न केला होता. मात्र, आता त्या भाजपात प्रवेश करणार आहेत. तनुजा घोलप यापूर्वी एकदा जिल्हा परिषद निवडणुकीत तसेच 2017 मध्ये नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या.