‘रासबिहारी’चे वार्षिक पारितोषिक वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 00:04 IST2019-05-10T23:36:13+5:302019-05-11T00:04:19+5:30

रासबिहारी शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले़ यानिमित्ताने शाळेच्या माजी विद्यार्थिनी आणि भूलतज्ज्ञ गायत्री खैरनार यांच्या उपस्थितीत गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.

 Annual Award Distribution of 'Ras Bihari' | ‘रासबिहारी’चे वार्षिक पारितोषिक वितरण

‘रासबिहारी’चे वार्षिक पारितोषिक वितरण

नाशिक : रासबिहारी शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले़ यानिमित्ताने शाळेच्या माजी विद्यार्थिनी आणि भूलतज्ज्ञ गायत्री खैरनार यांच्या उपस्थितीत गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. शाळेचे विश्वस्त श्रीरंग सारडा यावेळी उपस्थित होते.
यंदाच्या स्नेहसंमेलनाची संकल्पना ‘मेडागास्कर’ या इंग्रजी चित्रपटावर आधारित होती. नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी ‘मेडागास्कर’ मधील गीतांवर संगीत नाटिका प्रस्तुत केली. शिशुवृंदातील बालगोपाळांनी ‘इट्स शोटाइम’, ‘आय वॉण्ट टू सेलिबे्रट’ हे पेग्विन नृत्य अशी विविध नृत्ये सादर केली. मुख्याध्यापक बिंदू विजयकुमार यांनी शैक्षणिक वर्षाचा अहवाल सादर केला. सूत्रसंचालन दिया गुजराथी, मोक्षदा चिरमाडे आणि आर्या मिश्रा यांनी केले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले़ मागील शैक्षणिक वर्षात झालेल्या वक्तृत्व, हस्तकला, निबंध अशा विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण तसेच गुणवंतांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

Web Title:  Annual Award Distribution of 'Ras Bihari'