रंगमंचावरून वास्तववादी समस्यांवर भाष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 00:40 IST2018-05-23T00:40:08+5:302018-05-23T00:40:08+5:30
पुरुषी नजरा आणि स्त्रियांकडे त्यांच्या बघण्याच्या दृष्टिकोनात लपलेला स्वार्थ...पुरुषामध्ये लपलेला जनावर नात्यापलीकडे जाऊनही तसाच वागत स्त्रीचे शोषणावर रंगमंचाद्वारे ‘वारुळातील मुंगी’ या एकांकिकेमधून भाष्य करण्यात आले. तसेच ‘ओळख’ एकांकि केमधून एका प्रेमीयुगुलाची ताटातुट आणि जिवांची घालमेल दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

रंगमंचावरून वास्तववादी समस्यांवर भाष्य
नाशिक : पुरुषी नजरा आणि स्त्रियांकडे त्यांच्या बघण्याच्या दृष्टिकोनात लपलेला स्वार्थ...पुरुषामध्ये लपलेला जनावर नात्यापलीकडे जाऊनही तसाच वागत स्त्रीचे शोषणावर रंगमंचाद्वारे ‘वारुळातील मुंगी’ या एकांकिकेमधून भाष्य करण्यात आले. तसेच ‘ओळख’ एकांकि केमधून एका प्रेमीयुगुलाची ताटातुट आणि जिवांची घालमेल दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला. निमित्त होते, सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित ‘पसा नाट्ययज्ञ’ या उपक्रमाचे. मयुरी थिएटर निर्मित ‘वारु ळातील मुंगी’ व ‘ओळख’ या एकांकिका सोमवारी (दि.२१) सादर करण्यात आल्या. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात रंगलेल्या या एकांकिकांनी सामाजिक वास्तवावर भाष्य केले. ‘वारु ळातील मुंगी’ या एकांकिकेमध्ये पुरुषामध्ये लपलेला जनावर कशाप्रकारे आपल्या स्वार्थापोटी स्त्रीचे शोषण करत आला त्यावर भाष्य करत पुरुषामधील जनावराचा चेहरा रंगमंचावर आणला गेला. महिलांचे शोषण करणाऱ्या एका विकृत पुरुषामधील जनावराला भानावर आणण्याचा प्रयत्न एका तरुणीकडून होत असतो; मात्र तो विकृत पुरुष त्याला त्याच्या प्रश्नांचे उत्तर मिळूनही विकृतपणा सोडत नाही आणि त्यामध्ये लपलेला जनावर पुन्हा स्त्रियांच्या शोषणाकडे वळतो, या कथानकाभोवती एकांकिका फिरत जाते. दिग्दर्शन मयुरी व प्रवीण कांबळे यांनी केले. नेपथ्य पुरुषोत्तम निरंजन, वेशभूषा मयुरी उपळेकर यांची होती. एकांकिमधील पात्र स्वराली गर्गे आणि विक्रम गवांदे यांनी साकारले. विजय तेंडुलकर लिखित ‘ओळख’ या एकांकिकेतून मधुकर व निर्मल या प्रेमीयुगुलांचे रुजणारे नाते अगोदरच तुटून जाते आणि उत्कट जाणिवेतून स्वत:ला तिच्याशी जोडू बघणारा प्रियकर आणि मर्यादांच्या आतलं गाव न दिसू देता ताठर असणारी प्रेयसी. दोघांनाही एकमेकांकडे यावसं वाटत असतानाच नियती एक समांतर छेद देते आणि यांच्या नात्यांची सुरुवात होण्याअगोदरच ताटातूट होते. त्यानंतर संवदेनशील मनाला हे असं नात्याचं तुटण चटका लावून जाते या कथानकभोवती नाटक फिरते. यामध्ये केतकी कुलकर्णी, अपूर्वा देशपांडे, पूजा सोनार, अंकिता मुसळे, सिद्धी शिरसाठ, आशिष गायकवाड आदींनी भूमिका साकारल्या.