वैनतेय विद्यालयात महात्मा फुले यांची जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 05:09 PM2021-04-11T17:09:08+5:302021-04-11T17:11:40+5:30

निफाड : येथील वैनतेय विद्यालयात थोर समाजसुधारक महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी प्रभारी प्राचार्य एस. पी. ...

Anniversary of Mahatma Phule at Vaintay Vidyalaya | वैनतेय विद्यालयात महात्मा फुले यांची जयंती

वैनतेय विद्यालयात महात्मा फुले यांच्या जयंती कार्यक्रमात बोलतांना एस.पी.गोरवे, सोबत बी.आर. सोनवणे, प्रा राजेंद्र सूर्यवंशी, प्रा एम.एस.माळी.

Next
ठळक मुद्दे वैनतेय विद्यालय

निफाड : येथील वैनतेय विद्यालयात थोर समाजसुधारक महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.

प्रारंभी प्रभारी प्राचार्य एस. पी. गोरवे यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रास्तविक मनीषा गुजराथी यांनी केले. याप्रसंगी गोरवे,पर्यवेक्षक बी. आर. सोनवणे, प्रा. एम. एस. माळी, किशोर धामोरे, श्रीमती एस. एस. कापसे, जालिंदर कडाळे यांची भाषणे झाली.

याप्रसंगी वैनतेय ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सचे विभाग प्रमुख प्रा. राजेंद्र सूर्यवंशी आदी मान्यवर होते.
 

Web Title: Anniversary of Mahatma Phule at Vaintay Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.