अनकवाडेत ग्रामसेवकावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 00:43 IST2018-11-16T00:42:54+5:302018-11-16T00:43:30+5:30
अनकवाडे येथील ढाब्यावर शासकीय कामासाठी गेलेल्या ग्रामसेवकावर ढाबा मालकाच्या साथीदारांनी हल्ला केल्याची घटना घडली.

मनमाड पोलीस स्थानकात फिर्याद देण्यासाठी आलेले ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, सरपंच, सदस्य व ग्रामस्थ.
मनमाड : येथून जवळ असलेल्या अनकवाडे येथील ढाब्यावर शासकीय कामासाठी गेलेल्या ग्रामसेवकावर ढाबा मालकाच्या साथीदारांनी हल्ला केल्याची घटना घडली.
अनकवाडे ग्रामपंचायत हद्दीत फौजी ढाबा व पेट्रोलपंप आहे. याचे काही काम अनधिकृतपणे करण्यात आल्याच्या तक्र ारी आल्यानंतर त्याची पाहणी करण्यासाठी ग्रामसेवक अमोल अहिरे, विस्तार अधिकारी ढवळे व ग्रामपंचायत सदस्य घटनास्थळी गेले असता ढाबा मालक हरमनसिंग सेखो व त्याच्या साथीदारांनी पाहणी करण्यास मज्जाव करून शिवीगाळ केली.
या प्रकरणी फौजी ढाबा मालक हरमनसिंग सेखो, ज्ञानेश्वर खेमणार, जसविंदर सिंग, विक्की लाली आणि संजू यांच्या विरु द्ध सरकारी कामात अडथळा आणणे, जातिवाचक शिवीगाळ करणे यांसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.