राज्यस्तरीय स्पर्धेत अंजलीकुमारी प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 01:08 IST2021-04-01T23:27:57+5:302021-04-02T01:08:27+5:30

घोटी : येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील गणित विभागाने आंतरराष्ट्रीय गणित दिनाच्या निमित्ताने राज्यस्तरीय आयोजित स्पर्धेत गणिताचे विविध क्षेत्रातील उपयोग या ऑनलाईन पीपीटी सादरीकरण स्पर्धेत महाविद्यालयातील अकरावी विज्ञान शाखेतील विद्यार्थिनी कु. अंजलीकुमारी मदनसिंग हिने प्रथम क्रमांक मिळविला.

Anjali Kumari first in the state level competition | राज्यस्तरीय स्पर्धेत अंजलीकुमारी प्रथम

इगतपुरी येथील के .पी.जी. महाविद्यालयात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक स्वीकारताना अंजलीकुमारी मदनसिंग समवेत डॉ .पी.आर.भाबड, प्रा . देविदास गिरी , प्रा .एस .एस . परदेशी आदी.

ठळक मुद्देद्वितीय क्रमांक पुणे येथील अबेदा इनामदार हिने मिळविला

घोटी : येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील गणित विभागाने आंतरराष्ट्रीय गणित दिनाच्या निमित्ताने राज्यस्तरीय आयोजित स्पर्धेत गणिताचे विविध क्षेत्रातील उपयोग या ऑनलाईन पीपीटी सादरीकरण स्पर्धेत महाविद्यालयातील अकरावी विज्ञान शाखेतील विद्यार्थिनी कु. अंजलीकुमारी मदनसिंग हिने प्रथम क्रमांक मिळविला.

द्वितीय क्रमांक पुणे येथील अबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयातील द्वितीय वर्ष विज्ञान शाखेतील विद्यार्थिनी खान मारिया असाद हिने मिळविला . गणित विभाग प्रमुख प्रा .जी टी . सानप यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते . अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ .पी .आर. भाबड हे होते . कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रा . देविदास गिरी , प्रा .एस .एस. परदेशी उपस्थित होते . सूत्रसंचालन प्रा .बी .एन. निकम यांनी केले . प्रा. जी.एस. कोल्हे यांनी आभार मानले 

Web Title: Anjali Kumari first in the state level competition