सवंदगाव सरपंचपदी अनिता शेवाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 00:56 IST2020-01-30T22:36:26+5:302020-01-31T00:56:02+5:30
सवंदगाव सरपंचपदी शिवसेनेच्या अनिता गोरख शेवाळे यांची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काळे होते. नवनियुक्त सरपंच श्रीमती शेवाळे यांचा कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सवंदगाव सरपंचपदी अनिता शेवाळे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे. समवेत पोपट शेवाळे, अरुण शेवाळे, शोभा शिंदे, वंदना पवार आदी.
मालेगाव : तालुक्यातील सवंदगाव सरपंचपदी शिवसेनेच्या अनिता गोरख शेवाळे यांची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काळे होते. नवनियुक्त सरपंच श्रीमती शेवाळे यांचा कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पोपट शेवाळे, अरुण शेवाळे, पोपट शेवाळे, विमल पवार, ध्रुपदा गायकवाड, हिरामण दळवी, वंदना पवार, शोभा शिंदे, दादाजी शेवाळे, बापु आहिरे, भिला शेवाळे, गोरख शेवाळे आदी उपस्थित होते.