शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

जानोरीकरांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2020 8:59 PM

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे एक शेतकरी कोरोना बाधित आढळून आल्यानंतर त्याच्या कुटुंबीयातील व्यक्तींना पिंपरखेड येथील केंद्रात क्वॉरण्टाइन करण्यात आले होते. कुटुंबातील या सदस्यांच्या घशाचे स्वॉब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचा काय अहवाल येतो, याकडे जानोरीकरांचे लक्ष लागून होते.

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे एक शेतकरी कोरोना बाधित आढळून आल्यानंतर त्याच्या कुटुंबीयातील व्यक्तींना पिंपरखेड येथील केंद्रात क्वॉरण्टाइन करण्यात आले होते. कुटुंबातील या सदस्यांच्या घशाचे स्वॉब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचा काय अहवाल येतो, याकडे जानोरीकरांचे लक्ष लागून होते. अखेर कुटुंबीयांतील सदस्यांचा अहवाल निगेटिव्ह आला असून त्यांना पुन्हा घरी सोडण्यात आल्यानंतर गावकऱ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले.दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे एक शेतकरी कोरोनाबाधित आढळल्याने कोरोनामुक्त झालेला तालुका पुन्हा हादरला होता. सदर रुग्णाच्या कुटुंबात असलेल्या व्यक्तींना कोरोना अहवाल चाचणीसाठी पिंपरखेड येथील शासकीय कोरोना केंद्र येथे हलवण्यात आले होते. त्यांचा अहवाल तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. सदर सर्व कुटुंबीयांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित कोशिरे यांनी दिली असता जानोरीकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. त्या कुटुंबाचे अहवाल निगेटिव्ह आल्याबरोबर त्यांना पुन्हा जानोरीत त्यांच्या घरी सोडण्यात आले. सदर कुटुंबीयांचे गावात आगमन होताच जानोरी ग्रामपंचायत कार्यालयासमोर टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी सरपंच संगीता सरनाईक, उपसरपंच गणेश तिडके, मोहाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. छगन लोणी, ग्रामविकास अधिकारी के.के. पवार, आरोग्यसेवक सुरेश भवर, विजय चौधरी, डॉ. नंदकुमार घोरपडे, गोरख तिडके, समीर शेटे, चेतन पाटेकर, श्यामराव खांबेकर, नीलेश विधाते आदी उपस्थित होते. सदर कुटुंबीयांना त्यांच्या घरापर्यंत नेऊन १४ दिवस घरातच थांबून पुरेपूर काळजी घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने इतरांनी घाबरून न जाता त्या कुटुंबीयांना सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले.--------------------------मधुमेही रुग्णासह गर्भवती कोरोनामुक्तसिन्नर : उपजिल्हा रु ग्णालयातून रविवारी (दि. ३१) दुपारी तीन जणांना घरी सोडण्यात आले. यात कणकोरी येथील १५ वर्षीय मुलगा, पांगरी येथील मधुमेह असलेला पुरु ष व गरोदर असलेली त्याची पत्नी यांचा समावेश आहे. सिन्नर ग्रामीण रु ग्णालयात वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात तिघांना निरोप दिला. येथील रु ग्णालयात २० बाधित उपचार घेत आहेत. यात नाशिकरोड, संगमनेर येथील प्रत्येकी एका रु ग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण बारा जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. यातील सात जण उपजिल्हा रु ग्णालयातील असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. निर्मला गायकवाड यांनी दिली.-----------------------------------तरीही लॉकडाउन राहणार!कुटुंबीयांचे अहवाल निगेटिव्ह आले असले तरी जानोरीतील लॉकडाउन मात्र कायम राहणार, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या वतीने गावातील संपूर्ण कुटुंबाची माहिती घेतली जात असून, आवश्यक त्या सूचना दिल्या जात आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने डॉ. सियॉन शाहूल, डॉ. संपदा गुरव, आरोग्यसेविका मंदा शिंदे, आरोग्यसेवक सुरेश भवर, विजय चौधरी, आशा गटप्रवर्तक रेखा बोस तसेचसुनीता बोस, सोनाली केंग, जयश्री चौधरी, सुवर्णा बेंडकुळे, गंगा जाधव, कमल गाडर, मनीषा केंग आदी आशासेविका मेहनत घेत असून,नागरिकांनी त्यांना आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक