शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

...अन् संतप्त मतदार फिरले माघारी; नाशिकमध्ये मतदान केंद्रावर एकच वाद

By suyog.joshi | Updated: May 20, 2024 17:41 IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतर्कता म्हणून मतदान केंद्रावर मोबाइल नेण्यासाठी बंदी घालण्यात आली होती.

पंचवटी, नाशिक: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतर्कता म्हणून मतदान केंद्रावर मोबाइल नेण्यासाठी बंदी घालण्यात आली होती. सकाळच्या वेळी अनेक मतदार आपले मोबाइल खिशात घेऊन गेले, मात्र त्यांना थेट मुख्य मतदान केंद्राच्या गेटवरच अडविण्यात येऊन मोबाइल काढून ठेवण्यास सांगितल्याने मोबाइल ठेवायचे कोणाकडे असा सवाल मतदारांना पडला. त्यावेळी त्यांनी बंदोबस्तकामी आलेल्या परराज्यातील पोलिसांकडेच मोबाइल स्वाधीन केले असता ‘मोबाइल हमारे पास देना मत, किधर भी रखो हमे क्या’ असे खडे बोल सुनावल्याने संतापाच्या भरात काही मतदारांनी मतदानाचा हक्क न बजावता माघारी फिरणे पसंत केले. 

एकाच कुटुंबातील चार ते पाच व्यक्ती मतदान करण्यासाठी गेले असता पोलिसांनी सर्वांनाच मोबाइल देऊ नका असे सांगितले, त्यावेळी काही जणांनी कुटुंबातील सदस्यांचे मोबाइल ताब्यात घेतले तर काहींनी पोलिसांकडेच मोबाइल देत आमचे मोबाइल तुम्ही सांभाळा आम्ही मतदान करून येतो अशी विनवणी केली. त्यावर काही महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी मतदारांचे मोबाइल त्यांच्या ताब्यात घेतले होते, परराज्यातील पोलिसांनी मात्र मोबाइल ताब्यात घेण्यास नकार दिल्याने आपले मोबाइल कोणाकडे ठेवायचे, असा प्रश्न पडला होता. काहींनी तर मोबाइल ठेवण्यासाठी कोणी ओळखीची व्यक्ती मिळत नसल्याने वाहनाच्या डिक्कीत ठेवले, तर काहींनी थेट मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारापासूनच काढता पाय घेत नियमावलीच्याविरुद्ध नाराजी व्यक्त करत मतदानावर पाणी सोडले. मतदान केंद्रात मोबाइल वापरएकीकडे मतदारांना मतदान केंद्रात मोबाइल घेऊन जाण्यासाठी बंदी घालण्यात येऊन तसे फलक लावण्यात आले होते, तर दुसरीकडे मात्र मतदान केंद्रातील कर्मचारी तसेच बंदोबस्तासाठी परराज्यातून आलेले पोलिस बिनधास्तपणे मोबाइलवर बोलत असल्याचे चित्र दिसत होते. मतदान केंद्रात कर्मचाऱ्यांना मोबाईलची मुभा, तर मतदारांना का नाही, असा सवाल संतप्त मतदारांनी यावेळी व्यक्त केला.

टॅग्स :Nashikनाशिकlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Votingमतदान