दुचाकीस्वाराच्या मृत्यूनंतर संतप्त जमावाची बसेसवर दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 13:08 IST2020-03-17T13:07:40+5:302020-03-17T13:08:55+5:30
पिंपळगाव बसवंत : परिसरातील शिरवाडे वणी फाट्याजवळ चांदवडच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या बसने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला.

दुचाकीस्वाराच्या मृत्यूनंतर संतप्त जमावाची बसेसवर दगडफेक
पिंपळगाव बसवंत : परिसरातील शिरवाडे वणी फाट्याजवळ चांदवडच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या बसने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर संतप्त जमावाने महामार्गावर जाणाºया बसेसवर दगडफेक केली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरवाडे वणी येथील संजय भिका डंबाळे हे आपल्या दुचाकी बजाज डिस्कवर एम .एच १५ ई.डी ६४८१ हिने मजुरीसाठी शिरवाडे कडून वडनेर भैरवकडे महामार्ग ओलांडत होते. त्याचवेळी वडाळीभोईच्या दिशेने भरधाव वेगाने येणाºया मालेगाव आगाराच्या बस एम. एच .२९ बी.एल ४२२० या क्र मांकाच्या बसने धडक दिल्याने दुचाकीस्वार संजय भिका डंबाळे यांना डोक्याला गंभीर मार लागल्याने ते जागीच ठार झाले. पिंपळगाव प्राथमिक रु ग्णालय नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांचा शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांना देण्यात आले. मुलाच्या फिर्यादीने बसचालक प्रवीण शामराव कचवे यांच्यावर पिंपळगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास पिंपळगाव पोलिस करत आहे.