शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

अंगणवाडी सेविका, मदतनीस भरतीचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 12:08 AM

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत कार्यरत असलेल्या राज्यातील अंगणवाड्यांसाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस भरतीवर असलेली स्थगिती उठविण्यात आली असून, महिला व बाल विकास विभागाने एकूण रिक्त पदांच्या ५० टक्के पदे तत्काळ भरण्यास अनुमती दिली आहे

ठळक मुद्देजिल्ह्यात साडेसातशे पदे रिक्त

नाशिक : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत कार्यरत असलेल्या राज्यातील अंगणवाड्यांसाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस भरतीवर असलेली स्थगिती उठविण्यात आली असून, महिला व बाल विकास विभागाने एकूण रिक्त पदांच्या ५० टक्के पदे तत्काळ भरण्यास अनुमती दिली आहे. शासनाच्या या निर्णयाने अंगणवाड्यांतील रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नाशिक जिल्ह्णात सुमारे साडेसातशे पदे रिक्त आहेत.नाशिक जिल्ह्णात ४७७६ अंगणवाड्या असून, मिनी अंगणवाड्यांची संख्या ५०६ इतकी आहे. काही वर्षांपूर्वी या अंगणवाड्यांच्या व्यवस्थापनाशी संबंधित प्रत्येक मोठ्या अंगणवाड्यांना एक सेविका व एक मदतनीसांची नेमणूक देण्यात आली तर मिनी अंगणवाडीला फक्त एकच अंगणवाडी सेविकांची नेमणूक करण्याचे शासनाचे आदेश आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून वाढत्या लोकसंख्येचा विचार करता ग्रामीण भागात अंगणवाड्यांमध्ये येणाऱ्या बालकांची संख्या वाढली, त्यामानाने अंगणवाडी सेविकांची संख्या अपुरी पडत असतानाच शासनाने सन २०१७ मध्ये अंगणवाड्यांची सुधारित संख्या निश्चित होईपर्यंत त्याचबरोबर अल्प उपस्थिती असलेल्या अंगणवाड्यांची एकत्रितीकरण करण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीसांची पदे भरण्यास स्थगिती दिलीहोती.शासनाच्या या आदेशाविरुद्ध राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असून, त्यावर सुनावणी सुरू आहे. मात्र राज्य शासनाच्याच शक्ती प्रदान कार्यक्रमांतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राज्यात अंगणवाडी सेविकांची रिक्त पदे भरली जावीत अशी वारंवार मागणी करण्यात आल्याने राज्याच्या मुख्य सचिवांनी यासंदर्भात आदिवासी जिल्ह्णांमध्ये अंगणवाडी भरतीवरील स्थगिती उठविण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण आदिवासी जिल्ह्णात रिक्त असलेली सर्व पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली आहे तर अन्य भागातील रिक्त असलेल्या एकूण पदांच्या ५० टक्के पदे भरण्यास मुभा देण्याचा निर्णय महिला व बाल विकास विभागाने घेतला आहे.अंगणवाडी सेविका व मदतनीसांची भरती करताना प्रामुख्याने जास्तीत जास्त मुलांची उपस्थित असणारी अंगणवाडी, आदिवासी क्षेत्रातील, कुपोषणाची तीव्र समस्या असलेल्या भागातील अंगणवाड्यांसाठीच भरती करण्यात यावी, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत. नाशिक जिल्ह्णात अंगणवाडी सेविकांचे १९१, मदतनीसांचे ४८८ व मिनी अंगणवाडी सेविकांची ७९ पदे रिक्त असून, त्याची एकूण संख्या ७५८ इतकी आहे. शासनाने ५० टक्के रिक्त पदे भरण्यास अनुमती दिल्याने जिल्ह्णात किमान साडेतीनशे अंगणवाड्यांना सेविका, मदतनीस मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रEducationशिक्षण