शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

देवळाली कॅम्प येथील प्राचीन खंडेराव टेकडीवर खंडोबाभक्तांनी ओढल्या बारागाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 12:18 AM

देवळाली कॅम्प : यळकोट यळकोट जय मल्हार, श्री खंडेराव महाराज की जय अशा घोषणा देत व भंडाºयाची उधळण करीत खंडोबाभक्त उत्तम मांडे यांनी बारागाड्या ओढल्या. यावेळी टेकडीच्या पायथ्याशी हजारो भाविकांची गर्दी उसळली होती.देवळाली कॅम्प येथील प्राचीन खंडेराव टेकडीवर चंपाषष्ठीनिमित्त भरणाºया यात्रेनिमित्त शुक्रवारी सकाळी पूजारी प्रकाश व नितीन आमले यांच्यासह अण्णाज ...

ठळक मुद्दे टेकडीच्या पायथ्याशी हजारो भाविकांची गर्दी वाजतगाजत काठी व पालखीची मिरवणूक

देवळाली कॅम्प : यळकोट यळकोट जय मल्हार, श्री खंडेराव महाराज की जय अशा घोषणा देत व भंडाºयाची उधळण करीत खंडोबाभक्त उत्तम मांडे यांनी बारागाड्या ओढल्या. यावेळी टेकडीच्या पायथ्याशी हजारो भाविकांची गर्दी उसळली होती.देवळाली कॅम्प येथील प्राचीन खंडेराव टेकडीवर चंपाषष्ठीनिमित्त भरणाºया यात्रेनिमित्त शुक्रवारी सकाळी पूजारी प्रकाश व नितीन आमले यांच्यासह अण्णाज ग्रुप सदस्यांच्या हस्ते महाभिषेक व महाआरती करण्यात आली. यावेळी प्रशांत म्हस्के, सचिन आमले, आमले परिवार व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  भगूर येथील आमले परिवाराच्या निवासस्थानपासून सकाळी प्रथेप्रमाणे खंडोबा टेकडीवर पालखी मिरवणूक आणण्यात आली. त्या ठिकाणी पालखीचे पूजन व महाआरती करण्यात येऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.खंडोबा टेकडी येथून देवळाली कॅम्पमध्ये वाजतगाजत काठी व पालखीची मिरवणूक काढण्यात आली. अण्णाज ग्रुपच्या वतीने भाविकांना नागेश देवाडिगा, धीरज मांडे, सुरेश शेटे, दीपक बलकवडे, दत्ता सुजगुरे आदींनी भरीत भाकरीच्या प्रसादाचे भाविकांना वाटप केले. दिवसभर भाविकांनी टेकडीवर दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती.  टेकडीच्या पायथ्याशी प्रथेप्रमाणे सायंकाळी खंडेराव भक्त उत्तम मांडे हे टेकडीवरून धावत पायथ्याशी आले. यावेळी भाविकांनी खंडेराव महाराजांच्या नावाचा गजर करत भंडाºयाची उधळण केली.

टॅग्स :NashikनाशिकFairजत्रा