शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

अंबडमध्ये एका बालकावर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 4:27 PM

अंबडलिंक रोड परिसरातील संजीवनगर भागात घाटोळ मळ्याजवळ अमोल पडवी या दीड वर्षाच्या बालकावर भटक्या कुत्र्यांनी एकत्र हल्ला चढविला. या हल्ल्यात बालकाला मोठी दुखापत झाली असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

ठळक मुद्देमोकाट श्वानांची वाढती संख्येला कचरा डेपो कारणीभूत

सिडको : पाच दिवसांपूर्वी इंदिरानगरमधील राजीव टाउनशिपजवळ भटक्या श्वानाने धुमाकूळ घालत एक दोन नव्हे तर तब्बल पाच नागरिकांना चावा घेत जखमी केल्याची घटना ताजी असताना पुन्हा अंबडमध्ये एका बालकावर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या मोकाट श्वान नियंत्रण मोहिमेचा फज्जा उडाल्याचे दिसत आहे.मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव हा चिंतेचा विषय बनत चालला आहे. शहरातील उपनगरीय भागात ही समस्या गंभीर होत असल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे. सिडको, अंबड, सातपूर, उपनगर, इंदिरानगर, वडाळागाव, डीजीपीनगर, जुने नाशिक आदी भागांमध्ये मोकाट श्वानांंच्या संख्येत वाढ झाली आहे. अंबडलिंक रोड परिसरातील संजीवनगर भागात घाटोळ मळ्याजवळ अमोल पडवी या दीड वर्षाच्या बालकावर भटक्या कुत्र्यांनी एकत्र हल्ला चढविला. या हल्ल्यात बालकाला मोठी दुखापत झाली असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. श्वानांंनी हल्ला चढविल्यानंतर परिसरात सर्वत्र गोंधळ उडाला. नागरिकांचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर दगड व लाठ्या-काठ्या घेऊन नागरिकांनी कुत्रे पळवून लावल्याने बालकाचा जीव वाचला अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.इंदिरानगर, पाथर्डी, अंबड या परिसरांत मोकाट श्वानांची वाढती संख्येला कचरा डेपो कारणीभूत आहे. कचरा डोपोच्या आवारात कुठल्याहीप्रकारचे कुंपण नसल्यामुळे या भागात सर्रासपणे श्वानांच्या झुंडी वावरत असतात. तेथून जवळच्या लोकवस्तीत कुत्र्यांचा शिरकाव होऊ लागल्याने नागरिकांमध्ये भीती व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाdogकुत्रा